मोठी बातमी! भोपाळमध्ये तंदूर बॅन, धक्कादायक कारण…
Tandoor Banned In Bhopal Due to Air Pollution : मध्य प्रदेशमधून (Madhya Pradesh) एक मोठी बातमी समोर आलीय. भोपाळमध्ये (Bhopal) तंदूर बॅन करण्यात आल्याची माहिती मिळतेय. यामुळे आता भोपाळवासीयांना बंधन पाळावं लागणार आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे महापालिकेने तंदूरमध्ये कोळसा जाळण्यास बंदी (Tandoor Banned) घातली आहे. तंदूर जाळणाऱ्यांना दंड ठोठावला जात आहे. हॉटेल व्यावसायिकांना आता तंदूरी रोटी आणि तंदूरपासून बनवलेल्या इतर पदार्थांना पर्याय शोधावा लागत आहे. भोपाळमध्ये तंदूरवर बंदी घातल्यामुळे खवय्यांचे मोठे वांधे झाले आहेत.
भाजपची डोकेदुखी वाढणार! शपथविधी सोहळ्यापूर्वीच अजितदादांनी फडणवीसांसमोर ठेवली ‘ही’ अट
दिल्लीत हिवाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत किमान तापमानाचा पारा 8.2 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दरम्यान, वाढत्या वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) प्रशासनासह लोकांची चिंता वाढली आहे. शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असून, त्यातच महापालिकेने तंदूर आणि शेवग्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून तंदूरच्या धुरामुळे लोक आजारी पडणार नाही.
हेमंत सोरेन मंत्रिमंडळात 11 नव्या चेहऱ्यांना संधी; कोणाला मिळाली संधी?
भोपाळ शहरात लहान-मोठ्या हॉटेल्समध्ये दररोज सुमारे 3 हजार तंदूर जाळले जातात, ज्यातून विषारी वायू पसरत असल्याचा दावा केला जातो. तज्ज्ञांच्या मते, तंदूर कोळसा जाळल्यावर त्यातून पारा, शिसे, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड, पार्टिक्युलेट्स आणि इतर विविध वायू तयार होतात. ज्यामुळे श्वसनाचे आजार वाढतात. त्यामुळे महापालिकेने तंदूर बंदीचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी शहरातील सर्व झोन अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना दिल्या आहेत. सल्ला देण्यासाठी शहरभर घोषणा दिल्या जातील. यासोबतच लग्नसमारंभात तंदूर जाळू नये, यासाठीही देखरेख ठेवली जाणार आहे.
मध्य प्रदेशात दिल्लीसारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी राज्य सरकार आणि शहरातील महापालिकाही सतर्क आहेत. ऑक्टोबरमध्येच, AQI- 178 मध्यम स्थितीत पोहोचला. उघड्यावर कचरा जाळल्याने वायू प्रदूषण 2.9% वाढले. धुळीमुळे 62.2% पर्यंत प्रदूषण पसरत आहे. बांधकामामुळे होणारे प्रदूषण सुमारे 12.1% आणि वाहतुकीतून होणारे प्रदूषण 13.0% वाढण्याची अपेक्षा आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे.