मुख्यमंत्री फडणवीसांकडून विदर्भासाठी मोठ्या घोषणा; तब्बल 5 लाख कोटींची होणार गुंतवणूक

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भासाठी मोठी भेट दिली आहे. विदर्भासाठी अनेक मोठ्या प्रकल्पांची घोषणा

Untitled Design (106)

Untitled Design (106)

Big announcements for Vidarbha from Chief Minister Fadnavis :यंदाच्या हिवाळी अधिवेशनात वेगळा विदर्भ झाला पाहिजे, त्याचप्रमाणे विदर्भाला सरकारकडून काही मिळालेलं नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. विदर्भात(Vidarbh) कोणतीही गुंतवणूक येत नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला होता. मात्र आता हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadanvis) यांनी विदर्भासारही मोठी भेट दिली आहे. विदर्भासारखा अनेक मोठ्या प्रकल्पांची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली. यावेळी त्यांनी परकीय गुंतवणुकीच्या(International Investment) बाबतीत महाराष्ट्र(Maharashtra) हा इतर राज्यांच्या तुलनेत अव्वल स्थानी असल्याचं देखील अधीरेखित केलं. सरकार सामंजस्य करार करत आहे. मात्र अनेकांना वाटत असेल की, फक्त सामंजस्य करार होत आहेत, त्यावर काही ठोस पावलं उचलली जात नाहीत. तर हे प्रकल्प अंमलात देखिल आणले जात आहेत.

Devendra Fadnavis : पुढच्या दोन वर्षात 1 लाख 20 हजार सरकारी नोकऱ्या देणार, CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

त्याचप्रमाणे पुढील काळात विदर्भ हा सोलर मोड्युलमध्ये देशात पहिला असेल. मराठवाड्यात डीएमआयसी सुरू केल्याने तिथे मोठ्या प्रमाणात ईव्ही गाड्यांचं प्रोडक्शन होत आहे. मराठवाडा हा ईव्ही कॅपिटल म्हणून समोर येत आहे. गुंतवणूक करण्यासाठी परकीय गुंतवणूकदार गडचिरोलीला पसंती देत आहेत. संपूर्ण राज्यात 15 लाख 72 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यापैकी 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही एकट्या विदर्भात होणार आहे. इलेक्ट्रिक वाहननिर्मितीमध्ये मराठवाड्यात 50 हजार कोटींची गुंतवणूक झाली असून यातून तब्बल 40 हजार रोजगार तेथे उपलब्ध झाले आहेत.

त्याचप्रमाणे 5 हजार कोटी रुपयांची स्टील उद्योगातील गुंतवणूक देखील मराठवाड्यात होणार आहे. कृषी क्षेत्रात देखील मराठवाड्यात 2 हजार 500 कोटींच्या गुंतवणुकीची तरतूद असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. विरोधकांकडून कायमच आरोप करण्यात येत आहेत की, मिहानमध्ये कोणतीही गुंतवणूक झालेली नसून तेथे रोजगाराचा प्रश्न आहे. मात्र मिहानमध्ये सध्या 31 कंपन्या कार्यरत असून 22 नवीन कंपन्या सुरू होत आहेत. देशातील आयटी क्षेत्रातील बिग सिक्स सहाच्या सहाही मिहानमध्ये आहे. एवढी मोठी आयटी इंडस्ट्री मिहानमध्ये होत आहे.

OBC आंदोलकांवर हल्ले; धनंजय मुंडेंनी आवाज उठवला, फडणवीसांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं

मिहानमध्ये सध्या विनंतील झालं असल्याने तिथं देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. 1710 एकर जमिनीवर नवीन नागपूर विकसित करणार असून नवीन बिजनेस डिस्ट्रिक्ट तयार करणार आहे. ज्यातून किमान 5 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग देखील मंजूर करण्यात आला असून त्याचा फायदा हा फक्त मराठवाडा किंवा विदर्भालाच होणार नाहीये. तर संपूर्ण महाराष्ट्राला या महामार्गाचा फायदा होणार आहे.

 

Exit mobile version