Download App

Big Breaking : बुकी अनिल जयसिंघानी यांचे उद्धव ठाकरे, वरूण सरदेसाईशी संबंध!

मुंबई : फरार बुकी बुकी अनिल जयसिंघानी आणि त्यांचे अनेक बुकी मित्र यांचे युवासेनेचे वरूण सरदेसाई यांच्याशी संबंध आहे. सन २०१४ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनिल जयसिंघानी यांचा शिवसेना पक्षात प्रवेश झाल्याचे फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेषतः युवासेनेचे वरूण सरदेसाई यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे पुढे आले आहे.

कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी याने ९ वर्षांपूर्वी खुद्द उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणामुळे नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

अनिल जयसिंघानी हा डिझाइनर मुलीला ब्लॅकमेल करत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. तर जयसिंघानी याचे अनेक बुकी मित्र हे युवासेनेचे वरुण सरदेसाई यांच्याशी संबंधित असल्याचे देखील पुढे आले आहे.

मुंबई क्राईम ब्रॅंचचे माजी उपायुक्त अमर जाधव यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे अनिल जयसिंघानी हे नाव पुढं आलं होतं. जाधव यांनी अनिल जयसिंघानी यांना क्रिकेट सामन्यांदरम्यान सट्टेबाजी करण्यास भाग पाडलं होतं. त्यांच्या मुलांना आणि पत्नीला ओलिस ठेवलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये मला तीन दिवस बेटिंग करण्याबाबत सांगितल्याचं अनिल जयसिंघानी यांनी दावा केला.

काही वर्षांपूर्वी कथित डिझायनर तरुणी अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली. अनिक्षा जयसिंघानी असं या तरुणीचं नाव असून तिने आपण एक डिझायनर असल्याचं सांगत असतं. त्यानंतर माझ्याकडे सट्टेबाज बुकींकडून पैसे कमवण्याचा एक प्लॅन आहे असं सांगत तिने अमृता फडणवीसांना एक कोटी रुपये देणार असल्याचं सांगितलं. मात्र, आम्ही अशी कामं करत नसल्याचं अमृता फडणवीसांनी या तरुणीला सांगितले.

या तरुणीच्या वडिलांचं नाव अनिल जयसिंघानी असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे असल्याचं आढळून आलं. हा जयसिंघानी वॉन्टेड असून सरकारी अधिकार्‍यांना धमकावणे, फसवणूक करणे आणि दिशाभूल करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

चाळीस आमदार परत येतील पण, एकनाथ शिंदे.. राऊतांनी सांगितले खरे कारण

या संदर्भात शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे म्हटल्या की, हे प्रकरण वाटतं तितकं साधं नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला लाचेच ऑफर येत असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. ब्लॅकमेल करणारी तरुणी आणि अमृता फडणवीस यांच्यात काही आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे. तसेच गृहमंत्र्यांच्या घरात एवढं काही होत असून त्यांची पत्नीचं जर सुरक्षित नसेल तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे कुचकामी असून त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा.

तर भाजपचे अतुल भातखळकर म्हणाले की, मागेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न झाला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून लवकरच त्याचा खुलासा होईल. त्यामुळे आता लगेच त्यावर काही बोलता येणार नाही.

Tags

follow us