चाळीस आमदार परत येतील पण, एकनाथ शिंदे.. राऊतांनी सांगितले खरे कारण
Nashik News : राज्यातील सरकारचे काही खरे नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत. हे सरकार कधी कोसळेल त्याचा काहीच नेम नाही. भाजपसोबत गेलेले आमदार लवकरच आमच्याकडे परत येतील. पण, एकनाथ शिंदे येणार नाहीत आणि आम्हीही त्यांना घेणार नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत भाष्य केले.
खासदार राऊत आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, की निवडणूक आयोगाला विचारून बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नाही. तर लोकांनीच त्यांना शिवसेनाप्रमुख हे पद दिले. निवडणूक आयोगाचा बाप जरी आला तरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह काढू शकणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला.
हे सुद्धा वाचा : Gopichand Padalkar : संजय राऊत हा वेडा झालेला माणूस; पडळकरांची टीका
येत्या 26 तारखेला उद्धवर ठाकरे यांची मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. त्यावेळी तुम्हाला शिवसेना काय आहे ते दिसेल असे त्यांनी सांगितले.
लोकसभेला दोनदा आपटलं आता विधानसभेतही आपटू; राऊतांनी राणेंना डिवचले..
राऊत पुढे म्हणाले, तुरुंगात असताना मी त्रास सहन केला. तरीही शिवसेना सोडली नाही. आणि भविष्यातही कधीच सोडणार नाही. या पुढील काळ संघर्षाचा राहणार आहे. संघर्ष तीव्र राहिल पण आपण विजयी होऊ याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेच शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात सरकारच दिसत नाही. राज्यात मुख्यमंत्री नाही तर मख्खमंत्री आहे. त्यांचे काम फक्त 40 खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवणे इतकेच आहे अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती.