‘लोकसभेला दोनदा आपटलं आता विधानसभेतही आपटू’; राऊतांनी राणेंना डिवचले..

‘लोकसभेला दोनदा आपटलं आता विधानसभेतही आपटू’; राऊतांनी राणेंना डिवचले..

Maharashtra Politics : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. एकमेकांवर टीका करण्याची संधी दोघेही सोडत नाहीत. आताही ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांनी डिवचले आहे. राऊत म्हणाले, की निलेश राणे सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. परंतु, आपण त्यांना त्या निवडणुकीत देखील पराभूत करायचं.

वाचा : शिंदेंनी आपले बाप सुद्धा बदलले, विनायक राऊतांची घणाघाती टीका 

ते पुढे म्हणाले, की त्यांचं (निलेश राणे) सध्या गुडघ्याला फेटा बांधून फिरणं सुरू आहे. म्हणे, विधानसभा लढणार आहेत. लोकसभेला दोनदा आपटलं आहे. आता एकदा विधानसभेला आपटायचा पराक्रम करायचा आहे. या मालवण आणि कुडाळ मतदारसंघात त्यांना परत एकदा पराभूत करू, असे आव्हान राऊत यांनी दिले.

Shashikant Warise : विनायक राऊतांच्या आरोपांवर राणे संतापले; म्हणाले, अजून किती दिवस..

राऊत यांनी शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांवरही आगपाखड केली. उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई आणि माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. राऊत यांनी या दोन्ही नेत्यांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की ज्यांचे हात बरबरटलेले आहेत तेच लोक शिंदेंसोबत जात आहेत.

तसे पाहिले तर शिंदे गटात जाणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ठाकरे गटात अस्वस्थता दिसत आहे. दोन्ही गटात जोरदार आरोप प्रत्यारोप होत असतात. आताच माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर आणखी कोण शिंदे गटात प्रवेश करणार याची चर्चा सध्या होत आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube