Shashikant Warise : विनायक राऊतांच्या आरोपांवर राणे संतापले; म्हणाले, अजून किती दिवस..

Shashikant Warise : विनायक राऊतांच्या आरोपांवर राणे संतापले; म्हणाले, अजून किती दिवस..

Shashikant Warise : राज्याच्या राजकारणात रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात विरोधकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्याऱ्यांना पोसले, असा गंभीर आरोप त्यांनी केला .

खासदार राऊत म्हणाले, की गुंडगिरी करणारा हा नीतेश राणे आणि नारायण राणे यांच्यासोबत राहणारा गुंड आहे. त्यांच्या चिथावणीखोरीमुळे वारिसे यांच्यासारख्या पत्रकारांची हत्या करण्यात येत आहे.

राऊत यांच्या या आरोपांवर निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही जोरदार पलटवार केला आहे. या आरोपांना उत्तर देताना राणे म्हणाले, की मला विनायक राऊत यांना एक प्रश्न विचारायचा आहे, की हाच आरोपी एक ते दीड महिन्यांपूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये उद्धव गटाचे आमदार राजन साळवींसोबत उपस्थित होता की नाही. रिफायनरीच्या किती मिटींगमध्ये हा व्यक्ती आणि साळवी भेटले आणि मागच्या वर्षभरात किती वेळा भेट झाली याचा राजन साळवी आणि विनायक राऊत यांनी खुलासा करावा, असे आव्हान राणे यांनी दिले. विनायक राऊत यांची खासदारकीची कामे संपली आहेत असे वाटते. आता किती वर्षे उद्धव ठाकरे यांची भांडी घासणार आहे, असा टोलाही राणे यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube