Big decision for contract workers equal pay for equal work : श्रमिक सेनेने मागणी केलेल्या कंत्राटी कामगारांसाठीच्या समान कामात समान वेतन तसेच वेतन वाढीच्या अधिसूचनेचा मसुदा जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे आता राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी असणार आहे.
श्रमिक सेनेच्या या प्रयत्नांमुळे फक्त नवी मुंबई महापालिका आणि परिवहन सेवेमधील हजारो कामगारांना या निर्णयाचा लाभ होणार नाही तर राज्यभरातील अ, ब, क, ड आणि उर्वरित भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लाखो कंत्राटी कामगारांना याचा लाभ होणार आहे. यासाठी श्रमिक सेनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर तसेच वनमंत्री गणेश नाईक यांना प्रत्यक्ष भेटून कंत्राटी कामगारांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
धनंजय देशमुखांच्या साडूचा कारनामा उजेडात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस गुन्हा दाखल करणार
यावेळी वाढती महागाई पाहता प्रत्येक वर्षी नियमितपणे कंत्राटी कामगारांच्या वेदनात वाढ व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मंत्री फुंडकर यांनी या जाहीर करण्यात आलेल्या मसुद्यावर दोन महिन्यात सूचना आणि हरकती आल्यानंतर तात्काळ निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.