धनंजय देशमुखांच्या साडूचा कारनामा उजेडात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस गुन्हा दाखल करणार

धनंजय देशमुखांच्या साडूचा कारनामा उजेडात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस गुन्हा दाखल करणार

File Case Against Dhananjay Deshmukh’s brother in law : बिड जिल्ह्यात सध्या खून, खंडणी, मारहाण या घटनांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येमुळे राज्यभरात संताप आहे. राक्षसी कृत्य करून संतोष देशमुख यांचा छळ करत त्यांची हत्या करण्यात आलीय. या घटनेनंतर मात्र बीडमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत (Beed Crime) आहे. राजकीय नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, यामधून गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस आलाय.

अशाच प्रकारे आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांच्या साडूचा सुद्धा एका व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामध्ये, तो एका व्यक्तीला शेतामध्ये मारहाण करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे बीडमध्ये सर्वच घटनांचं केवळ राजकारण सुरू आहे. आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची एक नवीन प्रथा बीडकर करत असल्याचं दिसतंय. या व्हिडिओवरून बीड पोलीस देखील कारवाई करत आहेत. दरम्यान आता धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर (Dadasaheb Khindkar) यांच्यावर देखील अशाच प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडचे एसपी नवनीत कावत यांनी यासंदर्भात माहिती दिली.

संग्राम कोते यांना न्याय मिळणार का? अजितदादा पारड्यात विधानपरिषदेचे झुकत माप टाकणार का?

पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी मधुसूदन या प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती मिळतेय. दादासाहेब खिंडकरच्या मारहाणीचा व्हिडिओ हा एक वर्षापूर्वीचा असून बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात खिंडकर विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दादासाहेब खिंडकर यांचा एक जूना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये खिंडकर एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसतोय.

तर हा व्हिडिओ जूना आहे. तो वाद देखील कधीच मिटलाय, असं दादासाहेब खिंडकर यांच्याकडून सांगण्यात येतंय. परंतु दादासाहेब खिंडकर यांच्यावर घरफोडी, पैसे उकळून फसवणूक करणे असे अनेक गुन्हे नोंद असल्याची देखील माहिती मिळतेय. दादासाहेब खिंडकर यांची पत्नी बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावाच्या सरपंच असल्याचं समोर येतंय. खिंडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असून मागील दहा वर्षापासून राजकारणात सक्रिय असल्याचं कळतंय.

डिसेंबर 2025 पर्यंत सेन्सेक्स 105,000 च्या पार जाणार, मॉर्गन स्टॅनलीचा अंदाज; ‘या’ 10 समभागांवर ‘ओव्हरवेट’

बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावातील ओमकार सातपुते नावाच्या तरुणाला चार जणांनी मारहाण केली होती. यामध्ये दादासाहेब खिंडकरचा देखील समावेश आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र प्रकरण आपापसात मिटवण्यात आलं होतं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube