Download App

…तर राज्यात मोठ्या घडामोडी अन् राजकीय पडझड, असीम सरोदेंचं विधान

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही तासांवरच येऊन ठेपला आहे. या निर्णयाची संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेली असतानाच आता कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालावर मोठं भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांना मान्यता दिली, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी आणि राजकीय पडझड पाहायला मिळणार असल्याचं विधान असीम सरोदे यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून स्वतः सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड करणार निकालपत्राचे वाचन

असीम सरोदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरले तर शिंदे गटातील इतर 24 आमदारही अपात्र ठरतील, असंही असीम सरोदेंनी नमूद केलं. ते बोलत होते. दरम्यान, 16 आमदारांची अपात्रतेचा मुद्दा आणि इतर याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सत्ताकेंद्र ताब्यात घेणाऱ्या राहुल जगतापांना पवारांकडून आणखी ताकद

तसेच उद्या फक्त महाराष्ट्राच्याच नाहीतर भारताच्या पक्षांत्तराच्या संदर्भातील प्रवृत्तीवर आणि पक्षांत्तर बंदी कायद्याच्या संदर्भात हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे. याचे दूरगामी परिणाम भारताच्या राजकारणावर होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. मागील काही काळात एका पक्षातून निवडून येणं आणि दुसऱ्या पक्षात जाणं, पक्षांत्तर करणं, पक्ष फोडणं, या सगळ्याच गोष्टी सातत्याने वाढत गेल्या आहेत.

Shreekant Shinde : स्वतः ची ओळख काकाच्या नावाने… अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला खासदार शिंदेंचं उत्तर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या वाईट प्रवृत्तीचा कडेलोट होईल, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. याची दखल सर्वोच्च न्यायालयाने गंभीरपणे घेतली तर संपूर्ण निकाल न्यायालयच देईल. कोण पात्र आहे? कोण अपात्र आहे? कुणाची चूक आहे? कुणी घटनाबाह्य काम केलं? या सगळ्याची नोंद या निकालामध्ये असणार असल्याचं ते म्हणाले.

फक्त १६ नाहीतर इतर २४ आमदारांसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यामुळे 16 आमदार अपात्र ठरले तर एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले इतरही आमदार अपात्र ठरू शकतात. शिवसेनेनं आणि उद्धव ठाकरेंनी सुनील प्रभू यांना ‘प्रतोद’ म्हणून नेमलं होतं. त्यांनी काही व्हीप जारी केले होते. त्या व्हीपचा अनादर करणारे सर्व आमदार अपात्र ठरू शकतात, असंही मत त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us