सत्ताकेंद्र ताब्यात घेणाऱ्या राहुल जगतापांना पवारांकडून आणखी ताकद

  • Written By: Published:
सत्ताकेंद्र ताब्यात घेणाऱ्या राहुल जगतापांना पवारांकडून आणखी ताकद

Rahul Jagtap: श्रीगोंद्यातील एक-एक सत्ताकेंद्र ताब्यात घेणारे माजी आमदार राहुल जगताप यांची ताकद आता वाढली आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना आणखी ताकद दिली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल जगतापांवर मोठा विश्वास दाखविला आहे. त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी निवड केली आहे. मध्यंतरी जगतापांबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु त्यांच्यावर पक्षाकडून विश्वास दाखविण्यात आल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तेच दावेदार असतील, असे बोलले जात आहे.

Maharashtra Political Crises : राज्यासाठी उद्या महत्वाचा दिवस! शिंदे राहणार की जाणार?

राहुल जगताप हे यापूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण परिषदेचे सदस्य होते. आता त्यांची व्यवस्थापन परिषदेवर बढती मिळाली आहे. व्यवस्थापन परिषदही रयतमधील सर्वोच्च परिषद मानली जाते. २०१४ च्या विधानसभेत राहुल जगताप यांनी बबनराव पाचपुते यांचा पराभव केला होता. परंतु २०१९ च्या निवडणुकीत राहुल जगताप यांनी अचानक माघार घेतली. एेनवेळी राष्ट्रवादीने घनश्याम शेलार यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी भाजपचे बबनराव पाचपुते यांना जोरदार टक्करही दिली होती.

‘सत्तासंघर्षाचा निकाल दोन दिवसांत न आल्यास पुन्हा सुनावणी’ उज्वल निकम असे का म्हणाले?

विधानसभा न लढणाऱ्या राहुल जगताप यांनी मात्र स्थानिक राजकारणात मात्र आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले. ते जिल्हा बँकेत बिनविरोध संचालक झाले. कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. नुकताच झालेल्या तालुका खरेदी विक्री संघ, बाजार समितीच्या निवडणुकीतही राहुल जगतापांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. जगतापांनी खरेदी विक्री संघ नागवडेंच्या ताब्यातून हिसकावून घेतली.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते हे एकत्र आले. त्यांनी राहुल जगताप यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राहुल जगताप यांनी श्रीगोंदा बाजार समिती ही आपल्या ताब्यात ठेवली आहे.

अनेक ग्रामपंचायती, सेवा संस्था जगतापांच्या ताब्यात आहेत. जगतापांनी स्थानिक राजकारणात आपला वचक ठेवलेला आहे. आता पवारांकडून रयत शिक्षण संस्थेवर घेऊन जगतापांवर आणखी विश्वास दाखविला आहे. त्यामुळे येत्या विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून राहुल जगताप हे दावेदार असल्याचे निश्चित झाल्याचे राजकीय चर्चा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube