Maharashtra Political Crises : राज्यासाठी उद्या महत्वाचा दिवस! शिंदे राहणार की जाणार?

  • Written By: Published:
Maharashtra Political Crises : राज्यासाठी उद्या महत्वाचा दिवस! शिंदे राहणार की जाणार?

Maharashtra Political Crises : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता न्यायालय या प्रकरणावर नेमकं काय निर्णय देणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. चंद्रचूड यांनी  एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी केली आहे.  ते म्हणाले की, घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाच्या निकालाचे संकेत चंद्रचूड यांनी दिले आहेत. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. उद्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांना अपत्रा ठरवार की त्यांच्या बाजून निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सत्ता संघर्षाच्या या सर्व सुनावणीदरम्यान 16 आमदारांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मनाला जात आहे. त्यामुळे आता उद्या न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर,  दुसरीकडे राजकारण्यांची धाकधूक वाढली आहे.

काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सत्तासंघर्षाच्या निकालावर भाष्य केले होते. यावेळी ते म्हणाले होते की, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच महाराष्ट्रातल्या काही राजकीय पंडित आणि काही पत्रकार यांनी निर्णय देऊन टाकला आहे. पुढचे कॉम्बिनेशनही करुन टाकले. सरकारंही तयार करून टाकली. मला असं वाटतं की हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय हे खूप मोठं न्यायालय आहे. शांतपणे निर्णयाची वाट बघावी. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत. काहीही होणार नाही. आम्ही जे काही केलं आहे ते सगळं कायदेशीर आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे.”

‘सत्तासंघर्षाचा निकाल दोन दिवसांत न आल्यास पुन्हा सुनावणी’ उज्वल निकम असे का म्हणाले?

‘अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं’

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर राहिलेला असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पुन्हा एकदा अतिमहत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा नव्या चर्चांना सुरूवात झाली आहे. अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं असे महत्त्वाचे विधान नार्वेकरांनी केले आहे. सध्याच्या सरकारने आपण अध्यक्ष असताना अधिवेशनात विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलं आहे. माझ्यासमोरच्या आकड्यांवरून हे सरकार धोक्यात नाही असेही ते म्हणाले.

Shinde VS Thackery : …तर उद्धव ठाकरे पुन्हा मुखमंत्री होणार, घटनातज्ज्ञांनी स्पष्टच सांगितले

निकालानंतर शक्यता काय?

राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला तर, नेमकं काय घडेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्या न्यायालयाने जर शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवले तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तातडीने राजीनामा द्यावा लागेल. एवढेच नव्हे तर, शिंदेंच्या राजीनाम्यानंतर नव्याने सरकार स्थापन करण्याचे सर्व सोपस्कार पार पाडावे लागतील. न्यायालयाचा निकाल जर एकनाथ शिंदेंच्या विरोधात लागला आणि त्यांची आमदारकी गेल्यास शिंदेंचे मुख्यमंत्रीपद राहणार की जाणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे झाल्यास शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि पुढील 6 महिन्यात शिंदे आमदार म्हणून निवडून येतील अशी शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत.

अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं; SC च्या निर्णयाआधी नार्वेकरांचं पुन्हा महत्त्वाचं विधान

तर, काहींच्या मते शिंदेंना पुढील सहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही असे सांगत आहेत. आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाईल. तसं झाल्यास पुढील निवडणुकीपर्यंत सद्यस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय सत्तासंघर्ष प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकजे सोपवलं जाईल आणि जर, निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर ठाकरे गट पुनर्विचार याचिका दाखल करुन पुन्हा कोर्टात दाद मागू शकते.

Sanjay Raut : ‘मी कुठे म्हणतो सामनाला…’ राऊत-पवारांमधील टीकेचा सिलसिला सुरूच

अपात्रतेची टांगती तलवार कोणत्या 16 आमदारांवर ? 

1.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – कोपरी-पांचपाखाडीचे आमदार,
2.आमदार तानाजी सावंत – भूम परंडा
3.आमदार अब्दुल सत्तार – सिल्लोड
4.आमदार यामिनी जाधव – भायखळा
5.आमदार संदीपान भुमरे – पैठण
6.आमदार भरत गोगावले – महाड
7.आमदार संजय शिरसाठ – छत्रपती संभाजीनगर पश्चिम
8.आमदार लता सोनावणे – चोपडा
9.आमदार प्रकाश सुर्वे- मागाठाणे
10.आमदार बालाजी किणीकर – अंबरनाथ
11.आमदार बालाजी कल्याणकर – नांदेड उत्तर
12.आमदार अनिल बाबर – खानापूर
13.आमदार संजय रायमूलकर – मेहेकर
14.आमदार रमेश बोरनारे – वैजापूर
15.आमदार चिमणराव पाटील – एरोंडोल
16.आमदार महेश शिंदे – कोरेगाव

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube