Sanjay Raut : ‘मी कुठे म्हणतो सामनाला…’ राऊत-पवारांमधील टीकेचा सिलसिला सुरूच

Sanjay Raut : ‘मी कुठे म्हणतो सामनाला…’ राऊत-पवारांमधील टीकेचा सिलसिला सुरूच

Sanjay Raut On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनामा सत्रानंतर आता राजकीय चर्चाना उधाण आले आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून यावर टिप्पणी केली होती. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात राऊत म्हणाले होते की, पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले.

त्यावर शरदपवारांनी पत्रकार परिषदेत राऊतांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले होते. पवार म्हणाले होते की, पक्षातील अनेकांना कॅबिनेट मंत्री करुन संधी दिली. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केलं हे जाहिर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर दुर्लक्ष करतो. सामना अग्रलेखात महत्त्व देत नाही. त्यांना काय लिहायचं ते लिहूदे हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही काय करतो ते आम्हाला ठाऊक आहे. पक्षात काय होतं तो आमचा घरातला प्रश्न. आम्ही आमचं काम करतो त्यांना काहीही लिहू दे.

Sanjay Raut : मणिपूर पेटलयं अन् मोदी कर्नाटकात, बजरंग बली त्यांच्या डोक्यात गदा मारणार, राऊतांचे वार

त्यानंतर देखील राऊत आणि पवारांमधील हा उत्तर प्रतिउत्तराचा सिलसिला सुरूच आहे. कारण आता पवारांच्या टीकेला राऊतांनी उत्तर दिले आहे. यावेळी राऊत म्हणाले की, ‘चांगली गोष्ट आहे, शरद पवार सामनाला महत्त्व देत नाही म्हणाले. मात्र, मी कुठे म्हणतो सामनाला महत्त्व द्या. शरद पवार आमच्या सर्वांचे नेते आहेत.’

त्यामुळे या नेत्यांच्या वादांचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार का? तसेच या टीकाटिपण्णीचा सिलसिला आणखई किती दिवस सुरू राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube