महाराष्ट्रासाठी आम्ही रक्त सांडलं; मुंबईवर चाल करून याल तर आडवे करू, मोदी शाहांवर उद्धव ठाकरेंचा वार

पक्षाच्या निर्धार मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली.

  • Written By: Published:
News Photo (86)

मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे. ते दोन व्यापारी कोण हे तुम्हाला माहिती आहे (BJP) असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. त्याचबरोबर अॅनाकोंडा साप म्हणतही अमित शाह यांना टोला लगावला. ते मुंबईत पक्षाच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते.

आज भाजप असेल मिंधे असेल त्यांच्याकडे पैसा आहे. पण जीवाला जीव देणारी माणसं नाहीयेत. त्या दिवशी, दसरा मेळाव्याच्या दिवशी पाऊस पडत होता. पाऊसमध्ये जाणवत होता, मध्येच जाणवत नव्हता. तुमचा प्रतिसाद एवढा की पाऊसही फिका पडला. पावसामुळे काही जण फटक्यातून वाचले. नाही तर आणखी फटकावणार होतो. विभाग प्रमुखांना नेहमी भेटतो. शाखाप्रमुखांच्या मिटिंग घ्यायचो. पण उपशाखाप्रमुखांची बैठक घ्यावी ही इच्छा होती. त्यामुळे ही बैठक घेतली.

Video : व्होट चोरी म्हणजे निवडणूक चोरी; अदित्य ठाकरेंकडून पुरावे दाखवत निवडणूक आयोगाची पोलखोल

ती आता सभाच झाली आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, गटप्रमुखांशी बोलणार आहे. उपविभागप्रमुखांकडे तीन शाखा येतात. शाखा प्रमुखाकडे महापालिका वॉर्ड येतो. उपशाखाप्रमुखांकडे दोन ते तीन मतदार याद्या येतात. आदित्य ठाकरे यांनी वरळीमधील मतदार याद्यातील घोळ दाखवले आहेत. आपल्याला हे काम महाराष्ट्रात करायचं आहे. मुंबईतून सुरुवात करायची आहे. मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे.

आज एक जण येऊन गेला. सामनात दोन बातम्या पाहिल्या, पहिल्या पानावर बातमी होती, भाजप कार्यालयाचं भूमिपूजन, आत बातमी आहे, जिजामाता उद्यानात अ‍ॅनाकोंडा येणार.  आपण पेंग्विन आणले. काही पेंग्विनच्या बुद्धीचे लोक आपल्यावर टीका करतात. ते सोडा. अ‍ॅनाकोंडा म्हणजे सर्व गिळणारा साप, तो येऊन गेला, त्यांना मुंबई गिळायचीय, पण ते मुंबई कशी गिळतात ते बघतोच, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आज अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून हल्लाबोल केला आहे.

 

Tags

follow us