Download App

Laxman Hake : मोठी बातमी ! लक्ष्मण हाके यांचे आंदोलन मागे

Laxman Hake : आताची सर्वात मोठी समोर आली आहे. वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी

  • Written By: Last Updated:

Laxman Hake : आताची सर्वात मोठी समोर आली आहे. वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके (Laxman Hake) मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये या मागणीसाठी उपोषण करत होते.

आज मंत्र्यांचं शिष्टमंडळ यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना भेट घेऊन आंदोलन स्थगिती करण्याची विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीनंतर आज लक्ष्मण हाके यांनी आपलं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

या शिष्टमंडळामध्ये मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) , उदय सामंत, गिरीश महाजन , अतुल सावे , धनंजय मुंडे , गोपीचंद पडळकर , समीर भुजबळ , प्रकाश शेंडगे , शब्बीर अन्सारी , संतोष गायकवाड , प्रशांत जोशी आणि अजय पाटणे यांचा समावेश होता.

आमच्या दोन ते तीन मागण्या सरकारकडून मान्य झाले असल्याची माहिती यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी दिली. तसेच हे आंदोलन स्थगित झाले आहे संपले नाही. सरकारकडून आम्हाला न्यायची अपेक्षा आहे. असं देखील यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले.

तसेच राज्य सरकारने बोगस सर्टिफिकेट देणाऱ्यांवर आणि घेणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यांनी त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि ते जाहीर करावं तसेच  पंचायत राजच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षण देऊन घेणार की त्याशिवाय घेणार हे देखील राज्य सरकारने स्पष्ट करावे असं देखील यावेळी हाके म्हणाले.

पावसाळी अधिवेशनात  सर्वपक्षीय बैठक होणार असून त्यामध्ये चर्चा होऊन निणर्य घेण्यात येईल असं सरकारने आश्वासन दिलं असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र  आम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही त्यामुळे आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरु ठेवणार आहे आता फक्त हे  तात्पुरतं स्थगित करण्यात येत आहे असं देखील हाके म्हणाले.

पवन कल्याण जिंकले, नेत्यानं स्वतःचं नावच बदललं; निवडणुकीत शब्द दिला तो खराच केला

सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. अन्याय झालेला समाज हळूहळू पुढे यावा यासाठी आरक्षण आहे असं भुजबळ म्हणाले. त्यांना स्वत्र्यंत आरक्षण द्या आम्ही त्याला पाठिंबा देणार अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली.

follow us