पवन कल्याण जिंकले, नेत्यानं स्वतःचं नावच बदललं; निवडणुकीत शब्द दिला तो खराच केला

पवन कल्याण जिंकले, नेत्यानं स्वतःचं नावच बदललं; निवडणुकीत शब्द दिला तो खराच केला

Andhra Pradesh Politics : दक्षिण भारतातील निवडणुका खासच असतात. येथे नेतेमंडळी (Andhra Pradesh Politics) अन् उमेदवार कधी काय आश्वासन देतील, वचन देतील याचा काहीच अंदाज नाही. आश्वासन दिलं आणि ते पाळलं असंही राजकारणात क्वचितच घडतं. आता असाच आश्वासन खरं करून दाखवणारा प्रकार आंध्र प्रदेशात घडला आहे. विशेष म्हणजे, हा शब्द मतदारांच्या फायद्याचा नव्हता तरी देखील पूर्ण केला गेला. आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण स्वतः विजयी झाले.  त्यामुळे वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते मुद्रागदा पद्मनाभम यांनी खरोखरच स्वतःचं नाव बदलून दाखवलं

रॉकेटपासून ते चंद्रयान-3 पर्यंत का होत आहे तामिळनाडू कनेक्शनची चर्चा; जाणून घ्या

आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या तेलुगू देसम पार्टीने दणदणीत विजय मिळवला. जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या हातून राज्याची सत्ता खेचून घेतली. दक्षिण भारतातील निवडणुका वेगळ्याच असतात. येथील नेते मंडळी निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडतात. कोणता नेता कधी काय आश्वासन देईल याचा काहीच अंदाज नाही. यंदाही अशीच काही आश्वासने नेते मंडळींनी दिली होती. यात एका नेत्याने मात्र निवडणूक काळात दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे.

राज्यातील वायएसआर काँग्रेसचे नेते मुद्रागदा पद्मनाभम यांनी असाच एक आगळावेगळा दावा केला होता. जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण (Pawan Kalyan) जर निवडणुकीत विजयी झाले तर मी माझं नाव बदलून टाकील असा दावा पद्मनाभम यांनी केला होता. निवडणुकीत पवन कल्याण विजयी झाले आहेत. त्यामुळे पद्मनाभम यांनी बोलले ते खरे करून दाखवले आहे. त्यांनी नावात बदल करून पद्मनाभ रेड्डी असे नवीन नाव धारण केले आहे.

..त्यानंतर मोदी-शहा नितीश-नायडूंचे पक्ष फोडतील; राऊतांचा खळबळजनक दावा

आंध्र प्रदेशातील पिथापुरम मतदारसंघातून पवन कल्याण विजयी झाले आहेत. या मतदारसंघात वायएसआरसीपीच्या उमेदवार वंगा गीता विश्वनाथ दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. याच दरम्यान पद्मनाभम यांनी दावा केला होता की वायएसआरसीपी उमेदवार पवन कल्याण यांचा नक्कीच पराभव करील. पण, असं घडलं नाही. या मतदारसंघातून पवन कल्याण मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे पद्मनाभम यांनी स्वतःचे नाव बदलून पद्मनाभ रेड्डी असे करून घेतले आहे.

आंध्र प्रदेशच्या राजकारणात या खास प्रकाराची जोरदार चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. या निवडणुकीत टीडीपी,भाजप, जनसेना या आघाडीला मोठं यश मिळालं. बहुमत मिळवत त्यांनी राज्यातील जगन मोहन रेड्डी यांचं सरकार घालवलं. यानंतर मागील आठवड्यात चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री तर पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्री  म्हणून शपथ घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज