भाजपने गमावला आणखी एक मित्र; मोदी-शाहंची ‘दक्षिण दिग्विजय’ मोहीम स्वप्नवतच राहणार?

भाजपने गमावला आणखी एक मित्र; मोदी-शाहंची ‘दक्षिण दिग्विजय’ मोहीम स्वप्नवतच राहणार?

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) आणखी एक मित्र गमावला आहे. आंध्रप्रदेशमधील जनसेना पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी एनडीएमधून बाहेर पडत असल्याची आणि तेलगू देसम पक्षाला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. “आंध्र प्रदेशच्या विकासासाठी आणि आंध्र प्रदेशमध्ये सुशासन आणण्यासाठी जनसेना आणि तेलगू देसम पक्षाची गरज आहे” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. (Actor, Politician Pawan Kalyan exits NDA to support Chandrababu Naidu)

तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर पवन कल्याण हे आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारवर नाराज आहेत. पवन कल्याण 14 सप्टेंबर रोजी चंद्राबाबू नायडूंना भेटण्यासाठी राजमुंदरी मध्यवर्ती कारागृहात गेले होते. यानंतर 18 सप्टेंबर रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते. मात्र आता त्यांनी एनडीए सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दारू सगळं काही नष्ट करते, मग ते आरोग्य असो वा चारित्र्य; गौतम गंभीरची खोचक टीका

2019 च्या निवडणुकीत पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने 5.6 टक्के मतांसह केवळ एक जागा जिंकली, तर टीडीपीने 39.7 टक्के मतांसह 23 जागा जिंकल्या. तर YSRCP ने 50.6 मतांसह 151 जागा जिंकल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ‘तेलगू देसम आणि जनसेना एकत्र आल्यास राज्यातील रेड्डी सरकार पराभूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी एका मित्राने सोडली साथ :

पवण कल्याण यांच्या रुपाने भाजपने दक्षिणेतून आणखी एक मित्र गमावला आहे. यापूर्वी अण्णाद्रमुक, देसिय मुर्पोक्कु द्रविड कळगम, जनाधिपथ्य राष्ट्रीय सभा या दक्षिणेतील पक्षाने भाजपची साथ सोडून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप दक्षिणेत पाय रोवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच एक एक पक्ष त्यांची साथ सोडताना दिसत आहे.

मोदी सरकारची मोठी घोषणा, आता केवळ 600 रुपयांत मिळणार LPG सिलिंडर

भाजपची दक्षिण दिग्विजय मोहीम :

भाजप मागील जवळपास 4 दशकांपासून दक्षिणेतील राज्यांमध्ये पक्षविस्तार आणि संघटनेच्या मजबुतीसाठी काम करत आहे. मात्र कर्नाटक वगळत भाजपला अद्याप केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये यश मिळालेलं नाही. या राज्यांमधील राजकारणावर तिथल्या प्रादेशिक पक्षांची मजबूत पकड आहे.

तामिळनाडूमध्ये 1967 पासून द्रमुक आणि अण्णाद्रमुक आलटून पालटून सत्तेत येत आहेत. तर केरळमध्ये मागील अनेक दशकांपासून काँग्रेस आणि डाव्यांचे प्राबल्य आहे.आंध्रप्रदेशमध्ये तेलगु देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांची पकड आहे. यातील वायएसआर काँग्रेस सध्या सत्ताधारी पक्ष आहे.

तेलंगणामध्ये स्थापनेपासूनच म्हणजे 2014 पासून चंद्रशेखर राव यांच्या आधीच्या तेलंगणा राष्ट्र समिती आणि आताच्या भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. कर्नाटकमध्ये केवळ भाजपला जनसमर्थन प्राप्त झाले आहे. मात्र या चार राज्यांमध्ये भाजपला अद्याप यश मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. अशात शिंदेंच्या शिवसेनेही दक्षिणेची मोहिम हाती घेतली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube