Download App

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘अवकाळी’च्या नुकसान भरपाईसाठी 177 कोटी

Good News For Farmers : राज्यभरात (Maharashtra) अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची (Farmer)उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांच्या हाताला आलेली पिकं वाया गेली आहेत. अशातच आता राज्य सरकारकडून (Shinde Fadnavis Sarkar) शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. राज्यात मार्च 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके (Agricultural crops)व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde)यांनी याबाबत प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे.

‘अरे! हिंमत असेल तर घ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका’

दि. 4 ते 8 मार्च व दि. 16 ते 19 मार्च 2023 यादरम्यान झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.

मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.

महसुली विभागनिहाय वितरीत केलेला निधी : अमरावती विभाग : 24 कोटी 57 लाख 95 हजार, नाशिक विभाग : 63 कोटी 9 लाख 77 हजार, पुणे विभाग : 5 कोटी 37 लाख 70 हजार, छत्रपती संभाजी नगर : 84 कोटी 75 लाख 19 हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. हा एकूण निधी 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी वितरीत केला आहे.

Tags

follow us