Eknath Shinde On Ramgiri Maharaj : मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्यामुळे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांच्या विरोधात अहमदनगर, संभाजीनगर आणि येवलामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे तर राज्यातील अनेक ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात आंदोलन करत लवकरात लवकर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज महंत रामगिरी महाराज यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मुख्यंमत्री शिंदे यांच्या या भेटीनंतर विरोधक शिंदेंवर जोरदार टीका करताना दिसत आहे. नाशिकमध्ये आयोजित एका सप्ताहाच्या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर दिसले.
या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, राज्यात संत परंपरा ही मोठी आहे, संतांच्या आशीर्वादामुळे राज्य कारभार सुरु आहे. म्हणून राज्यात संतांच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याची हिंमत कुणी करणार नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलताना केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या सिन्नर तालुक्यात सुरू असणाऱ्या हरिनाम सप्ताहाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दर दिवशी येथे लाखो भाविक येतात.आम्हाला जर एखादी सभा घ्याची असेल तर आम्हाला काय काय करावे लागते, पण इथे स्वतःहून लाखो लोक दररोज येतात. या वर्षी आषाढीला 25 लाख लोक आले होते, आज वारकरी संप्रदायाची ताकद गावागावात आहे आणि त्यांना दिशा देण्याचे काम रामगिरी महाराज करत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, इथे देवाचा वास आहे, म्हणून इथे मोठ्या प्रमाणात लोक बसतात, इकडे कडक ऊन असून देखील मोठ्या संख्येने लोक इथे बसले आहे. आनंद दिघे हा साप्ताह कधी चुकवत नव्हते. सर्व वारकरी भक्ती पंथावर चालणाऱ्यांना मी करतो. तुम्ही सर्वजण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी झालेले विठ्ठल स्वरूप आहात म्हणून मी आपले दर्शन घेण्यासाठी आलो.
या वेळेस मी आषाढीला आठ दिवस अगोदर गेले आणि तिथे व्यवस्था पहिली. आपल्याला पंढरपूरला चांगला अनुभव आला असेल. खऱ्या अर्थाने गोदावरी धाम 177 वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाला सूरुवात केली आणि आपले महंत गंगागिरी महाराजांचं काम पुढे नेणारे रामगिरी महाराज यांचे आभार व्यक्त करतो. असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी गिरीश महाजन देखील उपस्थित होते.
‘ही बालिशबुद्धी आहे’, हॉटेल राजकारणावरून महेश लांडगेंनी लावला अमोल कोल्हेंना टोला
इम्तियाज जलील आक्रमक
तर दुसरीकडे संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलीलने देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत रामगिरी महाराज यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केले तसेच रामगिरी महाराजाला लवकरात लवकर अटक करा नाहीतर मुस्लिम समाज शांत बसणार नाही व त्याचे वक्तव्याची चौकशी करा हा कोणी साधुसंत नाही हा राजकारण्याची कठपुतली आहे असे जलील यांच्याकडून सांगण्यात आले.