‘ही बालिशबुद्धी आहे’, हॉटेल राजकारणावरून महेश लांडगेंनी लावला अमोल कोल्हेंना टोला

‘ही बालिशबुद्धी आहे’, हॉटेल राजकारणावरून महेश लांडगेंनी लावला अमोल कोल्हेंना टोला

Mahesh Landge On Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत बोलताना भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यावर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप करत भोसरीमधील एका कर्तृत्ववान व्यक्तीचे लंडनमध्ये (London) 200 कोटींचे हॉटेल आहे असं म्हटले होते. त्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता जर माझे हॉटेल आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईल असा सडेतोड उत्तर आमदार महेश लांडगे यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिला आहे. ते आज पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार महेश लांडगे म्हणाले की, अमोल कोल्हे यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही. सुसंस्कृत नेत्यांकडून असे आरोप होणं योग्य नाही आणि जर माझ्या शहरातील एकदा व्यक्तीचे लंडनमध्ये व्यवसाय असेल तर त्याचा मला अभिमान आहे. असं महेश लांडगे म्हणाले.

महेश लांडगे पुढे म्हणाले की,  जर अमोल कोल्हे याचा रोख माझ्याकडे असेल तर त्यांनी तसे पुरावे सादर करावेत आणि जर लंडनमध्ये माझा हॉटेल आढळल्यास मी राजकारणातून संन्यास घेईल. त्यांनी खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करू नये. ते सुशिक्षित त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून आरोप करू नयेत. असेही यावेळी महेश लांडगे म्हणाले.

तसेच 1400 कोटींचा डीपीआर आहे आणि इंद्रायणी नदी प्रकल्पावर आत्तापर्यंत कधीच खर्च झाला नाही, याचे माझ्याकडे पुरावे आले, खर्च झाल्याचा आरोप केला असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत. अमोल कोल्हे अतिहुशार व्यक्तीचे ऐकून आरोप करत आहेत, ही बालिशबुद्धी असा टोला देखील महेश लांडगे प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांना लावला.

तसेच पहिलवान संपूर्ण वर्ष म्हणजेच 365 दिवशी तयारी करत असतो, कधीही कुस्ती लागली की तो लढायला तयार असतो त्याचप्रमाणे मी देखील निवडणुकीसाठी तयार आहोत. अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही असेही यावेळी महेश लांडगे म्हणाले.

मोठी बातमी! जम्मू-कश्मीर आणि हरियाणामध्ये विधानसभेचे बिगूल; 4 ऑक्टोबरला मतमोजणी

नेमकं काय म्हणाले होते अमोल कोल्हे ?

शिवस्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत बोलताना इंद्रायणी नदीवर 1400 कोटी रुपये खर्च झाल्यानंतरही सहा महिन्याला एकदा इंद्रायणी नदी फेसळलेली कशी दिसते?, भोसरीमध्ये काहीजण कर्तृत्ववान माणसं आहेत. हे मी खर बोलत आहे. लंडनमध्ये 200 कोटींचे हॉटेल कुठल्या तरी भोसरीमधील व्यक्तीचे, असे माझ्या कानावर आलेलं आहे असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले होतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube