अर्थमंत्री न वाचताच सह्या करत होते; जयंत पाटलांच्या तोंडी शिंदे-अजित पवार फाईल वॉर..
Jayant Patil vs Ajit Pawar : राज्यातील महायुती सरकारमध्ये सारं काही ठीक नाही अशा बातम्या सातत्याने येत आहेत. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद झाल्याची आणखी एक बातमी काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. परंतु, अजितदादांनी असल्या बातम्या धादांत खोट्या असल्याचे सांगत आमच्यात कोणतेच मतभेद नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, विरोधक मात्र टोलेबाजी करण्याचे थांबलेले नाहीत. आज महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना डिवचलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून आलेल्या फाईलवर सही करण्यास अजित पवारांनी नकार दिला. सरकारकडून विचार न करता घोषणा केल्या जात आहेत. एकदा तर अर्थमंत्र्यांनी (अजित पवार) फाईलवर सही करण्यास नकार दिला. मी न वाचता सही करणार नाही असं सांगितलं. मग याचा अर्थ याआधी न वाचताच सह्या झाल्या. त्यांचा स्वभाव तसा नव्हता. परिस्थितीनुसार तसं होत असतं. विचार न करता योजना झाल्या. आता सचिव म्हणतो काहीही पाठवू नका मिळणार नाही अशी या सरकारची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली.
आता जे मिळतंय ते घ्या पण, भविष्यात.. ‘लाडकी बहिण’ योजनेवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य
राज्यातील 31 मतदारसंघांत भाजपला जनतेनं नाकारलं आहे. त्यामुळे सरकार घाबरलं आहे. या गोष्टीची जाणीव झाल्याने सरकार आता प्रचंड घोषणा करत आहे. या घोषणा इतक्या झाल्या की अर्थमंत्र्यांनीच (अजित पवार) मी न वाचता सही करणार नाही असं सांगितलं. मग याचा अर्थ आधी सह्या न वाचताच झाल्या. त्यांचा स्वभाव तसा नव्हता. परिस्थितीनुसार तसं होत असतं. विचार न करता योजना झाल्या. आता सचिव म्हणतो काहीही पाठवू नका मिळणार नाही अशी या सरकारची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली.
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेत आता तुम्हाला जे काही मिळतंय ते घ्या आमची काही तक्रार नाही. पण भविष्यात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या योजना आधिक विचारीपणे आम्ही चालवू आणि तुम्हाला अधिक ताकदीने मदत करू तेव्हा चिंता करू नका अशी ग्वाही जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात दिली.
आमदारांचा निरोप समारंभ अन् देवेंद्र फडणवीसांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले, जयंत पाटील हे कधी आमच्या