Download App

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात मोठी अपडेट…

मुंबई : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सागर बंगल्यात पैशांची बॅग पोहचवल्याचा व्हिडिओ कोणी शुट केला. याबाबत अनिक्षा जयसिंघानीने पोलिसांना सांगितलं आहे. मात्र, ज्या दोघांची नावे अनिक्षाने सांगितलीत त्यांच्या जबाबनूसार आमचा याच्याशी काहीएक संबंध नसल्याचं दोघांनी सांगितलंय.

राहुल गांधींना शिक्षा… Sharad Pawar यांनी व्यक्त केली ‘ही’ चिंता!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच ऑफर केल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांना थेट विधानसभेत सांगितली होती. लाच न स्विकारल्याने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलही करण्यात आल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं.

या प्रकरणी पैशांनी भरलेली बॅग सागर बंगल्यावर पोहचवल्याचा व्हिडिओ अनिक्षा हिने पाठवला होता. हा व्हिडिओ कोणी शूट केला याचा तपास पोलिस करीत आहेत. तपास सुरु असतानाच अनिक्षाकडून सागर बंगल्यातील दोन जणांची नावे उघड झाली.

राज्यातील कृषी सहाय्यकांना मिळणार नवं नाव; राम शिंदेंना कृषिमंत्र्यांचं आश्वासन

लाचेच्या ऑफरनंतर अमृता फडणवीस यांना ब्लकमेल करीत असताना अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिघांनी सतत संपर्कात असल्याचंही उघड झालंय. तसेच अनिक्षाने दोन व्हिडिओ अमृता यांना पाठविल्यानंतर अमृता यांचे उत्तर आल्यानंतर लगेचच तिने आपल्या वडिलांना त्याचे स्क्रिनशॉट पाठवले होते.

दरम्यान, पैशांची बॅग सागर बंगल्यात कोणी पोहचवली याबाबत चौकशी केली असता त्या दोन जणांनी आपला याच्याशी काहीएक संबंध नसल्याची माहिती पोलिसांना दिल्याची माहिती समोर आलीय.

अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केल्यानंतर सध्या जयसिंघानी पोलिस कोठडीत असून आज त्याची पोलिस कोठडी संपणार आहे.

Tags

follow us