राज्यातील कृषी सहाय्यकांना मिळणार नवं नाव; राम शिंदेंना कृषिमंत्र्यांचं आश्वासन

राज्यातील कृषी सहाय्यकांना मिळणार नवं नाव; राम शिंदेंना कृषिमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई : राज्यातील (Maharashtra)कृषी सहाय्यकांच्या (Agricultural Assistant)पदनामाबाबत केलेल्या आज राम शिंदेंनी (Ram Shinde)विधान परिषदेत (Legislative Council)प्रश्न उपस्थित केला. त्यांनी कृषी सहाय्यक पदनामात बदल करुन सहाय्यक कृषी अधिकारी (Assistant Agricultural Officer) असे करण्याची मागणी केली. त्यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar)यांनी ते मान्य केले आहे. येत्या 15 पंधरा दिवसांमध्ये याबाबद निर्णय घेणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे एकप्रकारे राज्यातील हजारो कृषी सहाय्यकांना न्याय मिळणार आहे. ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. त्यावर आज ठोस निर्णय घेत ते मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे

The Elephant Whisperers : सोशल मीडियावर होतीये ‘या’ फोटोची तुफान चर्चा

राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानपरिषदेचे आमदार राम शिंदेंनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्याचवेळी त्यांनी राज्यातील कृषी सहाय्यकांच्या पदनामाबाबत प्रश्न उपस्थित केला. राज्यातील कृषी सहाय्यकांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी असे करण्याची मागणी महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटनेकडून सरकारकडे सातत्याने केली जात आहे. आज त्याच विषयाचा पाठपुरावा आमदार राम शिंदेंनी उपस्थित केला आहे. त्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, कृषी सहाय्यक या पदनामामध्ये बदल करुन सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल करण्याचा निर्णय येत्या 15 दिवसांमध्ये घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. कृषी आश्वासनामुळे राज्यातील हजारो कृषी सहाय्यकांच्या मागणीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे राज्यातील कृषी सहाय्यकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कृषी विभागाचा नवीन आकृतिबंध करताना कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक या संवर्गाची पदे कमी न करता त्यात राज्याचे कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आकृतिबंधाच्या सभेत संघटनेने सुचवल्याप्रमाणे वाढ करण्यात यावी. सुधारीत आकृतिबंधामध्येच कृषी सहाय्यक यांच्या पदनामात बदल करून ते सहाय्यक कृषी अधिकारी असे प्रस्तावित करण्यात यावे अशी संघटनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube