Download App

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! 20 लाख लाडक्या बहि‍णींना मिळणार हक्काची घरं

  • Written By: Last Updated:

CM Devendra Fadanvis Announced 20 Lakh Houses : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चांगलाच बोलबाला झाला होता. त्यानंतर मात्र अजून लाडक्या बहि‍णींना योजनेचे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे पुढील हप्त्यांचे पैसे कधी मिळणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान आता पुण्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मोठी घोषणा केलीय.

‘माझ्या मुलाला मारहाण करून त्याचे…’, सोमनाथ सुर्यवंशींच्या आईचा साश्रू नयनांनी दावा

राज्यात महायुतीचं सरकार आलंय, त्यानंतर केंद्राकडून मोठं गिफ्ट मिळालंय. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एकाच वर्षामध्ये राज्यात वीस लाख घरांना मंजुरी मिळालेली आहे. या योजनेचा लाभ जे बेघर आहेत त्यांना मिळणार असून विशेष करून शेतकरी आणि लाडक्या बहि‍णींना या घरांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. राज्यातील लाडक्या बहि‍णींना दरमहा पंधराशे रूपये दिले जातात. यासोबतच आता लाडक्या बहि‍णींना स्वत:चं घर सुद्धा मिळणार आहे.

मोठी बातमी! विनोद कांबळी यांची प्रकृती खालावली, ठाण्यातील रुग्णालयात दाखल

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालंय. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होवून खातेवाटप देखील करण्यात आलंय. खाते वाटप झाल्यानंतर सरकार अजूनच अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं दिसतंय. अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेमध्ये वार्षिक उत्पन्न अडीच लाख रूपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना दरमहा अडीच लाख रूपये मिळणार आहेत. या योजनेतंर्गत महिलांना आतापर्यंत पाच हप्ते देण्यात आलेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार, याकडे राज्यातील लाडक्या बहि‍णींचं लक्ष लागलेलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी या योजनेवरून एकमेकांवर निशाणा साधला होता. महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना 2100 रूपये देणार असल्याचं जाहीर केलं. या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, असं राजकीय विश्लेषक म्हणाले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहीण योजनेचा हप्ता 2100 रूपये करण्यावर चर्चा करणार असल्याचं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

 

follow us