मोठी बातमी! विनोद कांबळी यांची प्रकृती खालावली, ठाण्यातील रुग्णालयात दाखल
Vinod Kambli Health Deteriorates admitted to Hospital : भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलंय. त्यांना ठाण्यात रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. विनोद कांबळे यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना ठाण्यातील आकृती रूग्णालयात भरती करण्यात आलंय. डॉक्टरांची टीम त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विनोद कांबळे यांच्या प्रकृतीबाबत मोठं अपडेट्स समोर (Vinod Kambli Health Deteriorates) आलंय.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सर्व आवश्यक चाचण्या केल्या जात असतानाही डॉक्टरांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवलंय. काही दिवसांपूर्वी रमाकांत आचरेकर यांच्या (cricket news) स्मृतीस्थळी बालपणीचा मित्र आणि दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला भेटल्यानंतर 52 वर्षीय हे नुकतेच चर्चेत आलं होतं. कार्यक्रमात विनोद कांबळी व्हिलचेअरवर बसलेला दिसला होता. तेव्हापासून चाहत्यांना देखील विनोदच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटू लागली होती.
राहुल गांधींचा परभणी दौरा निव्वळ राजकीय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
विनोदची प्रकृती खालावल्याने शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती खालावल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचा विषय होता. यावेळी 1983 च्या विश्वचषकाच्या संघातील सदस्यांनी त्याला आर्थिक मदत देऊ केली. कांबळीने देखील ही मदत उघडपणे स्वीकारली आहे.
सोमनाथ सुर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप…
काही वर्षांपूर्वी विनोदला हॉर्ट अटॅक आला होता, यावेळी देखील विनोद कांबळी यांना तशीच समस्या जाणवत असल्याचं समोर आलंय. त्यासाठी विनोदला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय. यासंदर्भात एक व्हिडिओ समोर आला होता, तो चांगलाच व्हायरल झालाय. यानंतर कांबळीची प्रतिक्रिया देखील समोर आलीय. माझं कुटूंब माझ्यासोबत आहे, असं देखील ते म्हणालेत.
Today meet great cricketer vinod kambli sir in AKRUTI hospital pic.twitter.com/3qgF8ze7w2
— Neetesh Tripathi (@NeeteshTri63424) December 23, 2024
त्याचवेळी विनोद कांबळी यांनी अजय जडेजा आणि अबे कुरुविलाकडून मिळालेल्या मदतीचीही कबुली दिली. “जडेजा माझा खूप चांगला मित्र आहे. तो मला भेटायला आला आणि म्हणाला, ‘चल, उठ’. अलीकडे मला बऱ्याच लोकांनी फोन केला आहे. सर्वांनी मला पाहिलंय. नक्कीच ते मदत करतील, ते माझ्या अन् माझ्या पत्नीच्या संपर्कात असल्याचं देखील विनोद कांबळी म्हणालेत. कांबळीने भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. आंतरराष्ट्रीय स्तरावर सहा शतकांसह 3000 हून अधिक धावा केल्या.