India Cricket : क्रिकेटमधील ‘डायमंड डक’ म्हणजे काय? टीम इंडियासाठी ठरला अनलकी !
India Cricket : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी 20 सामन्यांच्या (India Cricket) मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव केला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर जोरदार षटकार खेचत रिंकू सिंह (Rinku Singh) याने संघाला विजय मिळवून दिला. तर दुसरीकडे याच सामन्यात भारताचे दोन फलंदाज डायमंड डक (Diamond Duck) झाले. म्हणजेच बाद झाले. पण बाद होणे आणि डायमंड डक या दोन शब्दांत फरक आहे. एखादा फलंदाज डायमंड डक होतो म्हणजे नेमकं काय होतं हे जाणून घेऊ या..
Ind Vs Aus : रोमहर्षक सामन्यात कांगारुंना नमवलं; भारताचा 2 गडी राखून विजय
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि अर्शदीप सिंह ज्या पद्धतीने बाद झाले त्यालाच डायमंड डक असा शब्द क्रिकेटमध्ये वापरला जातो. ज्यावेळी एखादा फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानात येतो पण एकही चेंडू खेळता नॉन स्टाईकला राहून धावबाद होतो त्याला डायमंड डक असे म्हटले जाते. या सामन्यात ऋतुराज आणि अर्शदीप सिंग या पद्धतीनेच बाद होऊन माघारी परतले. टी 20 क्रिकेटच्या इतिहासात ऋतुराज गायकवाड अशा पद्धतीने बाद होणारा तिसरा तर अर्शदीप सिंग हा चौथा खेळाडू ठरला.
थोडे मागे जाऊन भारतीय क्रिकेटच्या इतिहासात डोकावून पाहिले तर जसप्रित बुमराह हा डायमंड डक पद्धतीने बाद होणारा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. अमित मिश्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अमित मिश्रा डायमंड डक झाला होता. त्यानंतर डायमंड पद्धतीने बाद होणारा ऋतुराज गायकवाड तिसरा तर अर्शदीप सिंग हा चौथा खेळाडू ठरला आहे.
World Cup विजयानंतर कांगारुंचा विजयी उन्माद! पायाखाली ट्रॉफी घेत मिचेल मार्शचे फोटोसेशन
षटकार खेचला पण, रन मिळालेच नाही
या सामन्यात रिंकू सिंहने षटकार मारल्यानंतरही त्या धावा काउंट झाल्या नाहीत. या सामन्यात भारताने 19.5 षटकात 208 धावा केल्या होत्या. जिंकण्यासाठी एकाच रनची गरज होती. रिंकू सिंग क्रीजवर होता. त्याच्यासमोर गोलंदाजीसाठी शॉन अॅबॉट होता. त्याने बॉल टाकला त्यावर रिंकूने षटकार खेचला. भारताला विजय मिळाला. विजयी षटकार रिंकूनेच मारला असेच सर्वांना वाटत होते. पण त्याआधीच टीम इंडियाचा विजय झाला होता. तसं पाहिलं तर अॅबॉटने टाकलेला बॉल हा नो बॉल होता. अशा परिस्थितीत भारताने त्याच नो बॉलवर विजय मिळवला होता. त्यामुळे रिंकू सिंहने षटकार मारला तरीही त्याचा उपयोग झाला नाही. त्याधावा रिंकू सिंहच्या खात्यात जमा झाल्या नाहीत.