सोशल मीडियावरील जिल्हाध्यक्षांची ‘ती’ यादी बनावटच; रवींद्र चव्हाणांनी नेमकं काय सांगितलं?

सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट आहे. या यादीचा पक्षाशी कोणताही संबंध नाही.

Bjp List

Bjp List

BJP District Chief Fake List : सोशल मीडियावर चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती व्हायरल होत असते. या माहितीचा फटका भाजपलाही बसला आहे. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या यादीतील नावांमुळे अनेकांचा संभ्रम निर्माण झाला होती. ही बाब लक्षात येताच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट आहे. या यादीचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. आतापर्यंत भाजपच्या फक्त ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बनावट यादीवर कुणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.

आशिष शेलार यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड नाही.. पाच इच्छुकांनी केले स्पष्ट

सदरील बनावट यादीत अनेक चुकीची नावं आहेत. ती हेतुपुरस्सरपणे पसरवण्यात येत असल्याची शक्यता पक्षानं व्यक्त केली आहे. उर्वरित जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल, असंही रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे. या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होण्याची शक्यता असून बनावट माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात सायबर क्राईम अंतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी फक्त अधिकृत माध्यमांद्वारे जाहीर होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही रवींद्र चव्हाणांनी केले आहे.

‘त्या’ यादीवर विश्वास ठेवू नका : विक्रांत पाटील

सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. आतापर्यंत भाजपच्या फक्त ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून अजून 22 जिल्हाध्यक्ष घोषित होणे बाकी आहे. त्यामुळे बनावट यादीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन भाजप नेते विक्रांत पाटील यांनी केले आहे.

आशिष शेलारांबाबतही चुकीची माहिती

मुंबई भाजप अध्यक्षपदी मंत्री आशिष शेलार यांची (Ashish Shelar) निवड झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु, यात आता मोठा ट्विस्ट आला आहे. आशिष शेलार यांची निवड झाल्याची बातमी चुकीची आहे. यामुळे कार्यकर्त्यांच संभ्रम निर्माण झाला आहे असे स्पष्टीकरण आले आहे. विशेष म्हणजे, हे स्पष्टीकरण अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या पाच नेत्यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का! समर्थकांसह बडा नेता मुंबईला रवाना; हाती बांधणार शिवबंधन

Exit mobile version