आशिष शेलार यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड नाही.. पाच इच्छुकांनी केले स्पष्ट

Ashish Shelar Mumbai : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटना बांधणीचा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन भाजपाने राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची निवड केली होती. यात मुंबई भाजप अध्यक्षपदी मंत्री आशिष शेलार यांची (Ashish Shelar) निवड झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु, यात आता मोठा ट्विस्ट आला आहे. आशिष शेलार यांची निवड झाल्याची बातमी चुकीची आहे. यामुळे कार्यकर्त्यांच संभ्रम निर्माण झाला आहे असे स्पष्टीकरण आले आहे. विशेष म्हणजे, हे स्पष्टीकरण अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या पाच नेत्यांनी दिलं आहे. BJP Mumbai या एक्स अकाउंटवरून केलेल्या ट्विटमध्ये या पाच नेत्यांची नावं आहेत. या ट्विटची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे.
नेमकं ट्विट काय ?
‘एका वर्तमानपत्राच्या माध्यमातून आशिष शेलार यांची पुन्हा भाजप मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्याची चुकीची बातमी प्रसिद्ध झाली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या आशिष शेलारजी अंदमान-निकोबार दौऱ्यावर असून त्यांनी स्वतः फोनद्वारे ही बातमी तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. या मजकुराखाली आमदार अतुल भातखळकर, मुंबई भाजपाचे सरचिटणीस सुनील राणे, आमदार अमित साटम, आ. योगेश सागर आणि आ. संजय उपाध्याय यांची नावं आहेत. आता अध्यक्षपदी हीच मंडळी इच्छुक आहेत.
मोठी बातमी! मंत्रिपद मिळालं तरीही प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास शेलार-बावनकुळेंचा नकार, कारण
नमस्कार,
एका वर्तमानपत्राच्या माध्यमातून आशिष शेलार यांची पुन्हा भाजप मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्याची चुकीची बातमी प्रसिद्ध झाली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सध्या आशिष शेलारजी अंदमान-निकोबार दौऱ्यावर असून, त्यांनी स्वतः फोनद्वारे ही बातमी तथ्यहीन…
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) May 17, 2025