Union minister Narayan Rane Get Ticket from Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha Seat : लोकसभेसाठी भाजपकडून 13 वी यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला तिढा सुटला आहे.
टायमिंग साधलं, पक्ष बदलला अन् तिकीटही मिळालं; महाराष्ट्राच्या रणांगणात आयारामांना लॉटरी!
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून शिवसेनेकडून किरण सामंत (Kiran Samant) इच्छूक होते. मात्र, आता महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोकणात ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत आणि नारायण राणेंमध्ये थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. किरण सामंत माघार घेत असल्याच उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. त्यांनी हे जाहीर करता लगेचच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली.
BJP fields Union minister Narayan Rane from Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha seat in Maharashtra.#LokSabhaElections2024 #LSPolls2024withPTI pic.twitter.com/s2hlvVOCSg
— Press Trust of India (@PTI_News) April 18, 2024
उदय सामंतांची पत्रकार परिषद अन् राणेंच्या नावाची घोषणा
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस तोंडावर असतानाही हा तिढा सुटलेला नव्हता. भाजपकडून नारायण राणे यांचं एकमेव नाव चर्चेत होतं. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरी मतदारसंघावर अखेर भाजपने झेंडा रोवत राणेंना मैदानात उतरवलं आहे. शिवसेना नेते उदय सामंत आणि किरण सामंत पत्रकार परिषद बोलत होते. यात उदय सामंत महायुतीचा कोणताही उमेदवार जाहीर होऊ दे त्यासाठी आम्ही काम करू असे सांगत होते. त्याचवेळी भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आले. किरण सामंत यांना आज ना उद्या खासदार करायचं हे निश्चित आहे. त्यामुळे आज जो काही तिढा निर्माण झाला होता, तो सोडवण्यासाठी किरण सामंत यांनी स्वत: पुढाकार घेतला, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
सांगलीसाठी ठाकरेंचं ‘मन’ परिवर्तन करणार काँग्रेसचा ‘हुकमी एक्का’; उत्तर मुंबईसाठीदेखील खास प्लॅन
उमेदवारीपूर्वी राणेंनी फोडला प्रचाराचा नारळ
महायुतीत सर्वाधिक वादग्रस्त ठरत असलेल्या मतदारसंघापैकी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) होती. या मतदारसंघात शिंदे गटाने किरण सामंत यांच्यासाठी तर भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी दावा ठोकला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कुणाला उमेदवारी दिली जाते याकडे सर्वांचा नजरा लागल्या होत्या. एकीकडे उमेदवारी जाहीर होत नसल्याने दोन्ही गटात टेन्शनचं वातावरण होतं. तर, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राणेंनी प्रचाराचा नाराळ फोडला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे शिंदे गटातील अस्वस्थता वाढली होती.