Uddhav Thackeray On PM Modi : विकासनिधी मिळत नाही म्हणून अडवाणी, अटलजी काँग्रेसशी लढले नसते तर आज पंतप्रधान मोदींचा राजकीय जन्म झाला नसता अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ‘ऑपरेशन तुडवा’ अंतर्गत आजपासून उद्धव ठाकरे सहा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार असून या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी यवतमाळमध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना खासदार संजय देशमुख यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच विकासनिधीवरुन देखील त्यांनी फुटीर खासदारांवर टीका केली.
यवतमाळमध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, अडवाणी, अटलजी काँग्रेसशी (Congress) लढले, त्यांना विकासनिधी लागला का? अटलजी आणि अडवाणी काँग्रेशी लढले नसते तर मोदी (PM Modi) आणि शाहांचा राजकीय जन्म झाला असता का? तुम्ही आमदार फोडले, चिन्ह चोरलं तरीही शिवसेना आणि ठाकरे उभा आहे. जर शिवसेना संपली होती तर मशाल चिन्हावर निवडून आलेले खासदार फोडावे का लागले? विकासनिधी ही भाजपच्या मालकीचा नाही. मोदीची लाट असताना देखील आम्ही महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आणले.
इथे वाघाचं जीवन जगत होता, तिथे गाढवचं जीवन जगा
तर यवतमाळ – वाशीमचे खासदार संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांच्यावर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दार भेटेल तिथे त्याला जाब विचारा. पुढील तीन वर्षे प्रत्येक ठिकाणी गद्दाराला जाब विचारा. मुलीची सोयरिक जुळवताना संजय देशमुख यांनी तिथे सोयरिक जुळवली. इथे वाघाचं जीवन जगत होता, तिथे गाढवचं जीवन जगा असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
तर हिंदुंत्वाच्या मुद्यावरून देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लावला. हा भाजप (BJP) नाही पाकिस्तान जनता पक्ष होण्याच्या मार्गावर आहे. राममंदिराच्या दानपेटेतील पैसे आणि चांदीच्या विटा चोरल्या. भाजप हा हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारा पक्ष आहे अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
मी सर्वांची माफी मागतो…, उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये शिंदे अन् फुटीर खासदारांवर भडकले
आमचं हिंदुत्व माणुसकी जपणारं, मंदिरं लुटणारं नाही. आम्हाला आता भाजपमुक्त श्रीराम पाहिजे, त्यासाठी आंदोलन करणार. आता आम्ही भोंदूंच्या विळख्यातून प्रभू श्रीरामाला सोडवणार. प्रश्न विचारु नका म्हणून शिवसेना संपवायला निघालेत कारण प्रश्न विचारण्याचं धाडस फक्त शिवसैनिक दाखवू शकतो. पुढील निवडणूकीत पुन्हा शिवसेनेचा खासदार होणार असं उद्धव ठाकरे म्हणाले.
