Download App

मोठी बातमी! भाजप नेते नारायण राणे रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती

नारायण राणे यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उद्या तातडीने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Written By: Last Updated:

BJP leader Narayan Rane in hospital : भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उद्या तातडीने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Rane) त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आलय. राणेंवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार हे अद्याप समोर आलेलं नाही.

नारायण तातू राणे यांचा जन्म 20 एप्रिल 1952 रोजी कोकणात झाला. मोठा जनाधार असलेल्या कोकणातील नेत्यांमध्ये नारायण राणेंचा समावेश होतो. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आक्रमक स्वभावाचे नारायण राणे शिवसेनेत वेगाने पायऱ्या चढत वर गेले.

सुरुवातीला चेंबुरमध्ये शाखाप्रमुख असलेले राणे 1985 साली मुंबई महानगरापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1990 साली कणकवली-मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे दुग्धव्यवसाय विकास, पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय, खार जमिनी, विशेष सहाय्य व पुनर्वसन, उद्योग या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला.

1997 साली त्यांच्याकडे महसूल खाते सोपवण्यात आले. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर 1998 ते 99 या काळात त्यांनी या पदाची धुरा सांभाळली. 2005 साली शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले. 2009मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळाले. त्यानंतर आता भाजपमध्ये आल्यानंतर नारायण राणे यांची राज्यसभेवर वर्णी लागली.

 

Tags

follow us