Maharashtra Politics: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: उद्धवजी (Uddhav Thackeray) जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा, आक्सिजनविना महाराष्ट्रात तडफडणारे रुग्ण आठवा आणि राज्यात हे सुरू असताना तुम्ही मात्र टेंडर वाटण्यात मश्गूल होतात. असा थेट सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. उद्धवजी जनाची नाही मनाची असेल तर […]

सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? बावनकुळेंचा कोंडी करणारा सवाल

सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? बावनकुळेंचा कोंडी करणारा सवाल

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: उद्धवजी (Uddhav Thackeray) जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा, आक्सिजनविना महाराष्ट्रात तडफडणारे रुग्ण आठवा आणि राज्यात हे सुरू असताना तुम्ही मात्र टेंडर वाटण्यात मश्गूल होतात. असा थेट सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.


उद्धवजी, तुम्ही तर मृतदेहासाठी वापरायच्या बॅगध्येही कट कमिशन सोडलं नव्हतं. मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का? मुख्यमंत्री नागपुरात का गेले नाहीत? नांदेडला का गेले नाहीत? मुख्यमंत्री घरात का बसले? असं कोण विचारतंय तर ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर सरकार चालवलं ते उद्धव ठाकरे!

उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तुम्ही नांदेडला जाणार का? तर त्यावर ते म्हणतात मी कशाला जाऊ? माझा पक्ष चोरलाय, माझं पद गेलं. म्हणजे पदावर असताना घरी बसायचं. पद गेल्यावरही घरात बसून पत्रकार परिषद घ्यायची आणि स्वतः काही करायचं नाही हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार! उद्धवजी, तुमचे सरकार असताना कोविड काळात जे घोटाळे झाले त्याबद्दल कधी तरी बोलणार की नाही? असे थेट सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला आहे.

‘गुवाहाटीत टेबलवर नाचायला पैसे पण, औषधांसाठी नाही’; नांदेड मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरे संतापले

नांदेड येथील सरकारी रुग्णालयात (Nanded Hospital Deaths) झालेल्या रुग्णांच्या मृत्यू्वरून राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका सुरू केलेली असतानाच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले तसेच रुग्णालयातील बळी हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळी आहेत, असा आरोप केला.

Exit mobile version