Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची काल मुलाखत झाली. यावेळी त्यांना 2024 साली तुम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करणार का, असे विचारण्यात आले होते. यावरुन 2024 साली कशाला आत्ताही दावा माझा दावा आहे, असे उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा रंगल्या आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने खळबळ
तुम्हाला तोंडाने मुख्यमंत्री होता येत नाही. प्रत्येक पक्षाची आपली क्षमता आहे. ते जर मुख्यमंत्री होत असतील तर त्यांना माझा शुभेच्छा आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला बहुमत मिळेल असेल तर ते मुख्यमंत्री होतील. आम्ही त्यांना शुभेच्छा देण्याचे काम करु शकतो. पण 2024 च्या निवडणुकीत आम्ही एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 200 पेक्षा अधिक जागा जिंकणार आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजप-शिवसेना युतीचाच होणार आहे, त्यामुळे उगीचच कोणी स्वप्न पाहू नये, असे ते म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या राजकीय भूकंप होणार या वक्तव्यावर देखील भाष्य केले आहे. याबाबत स्वत प्रकाश आंबेडकर सांगू शकतील. मला त्यांना विचारावे लागेल, असे त्यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीने चुकीच्या व्यक्तीकडे नेतृत्व दिल्याने त्यांचे सरकार गेले. त्यामुळे आात पुन्हा उद्धव ठकारेंकडे नेतृत्व दिल्यास आमदारकी पण जाईल असे त्यांच्या आमदरांना वाटते आहे, असे म्हणत बावनकुळेंनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.