दुसऱ्याच्या संस्थेत घटना बदलून अध्यक्ष झालेले…; बावनकुळेंचा पवारांना टोला

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे. यांना दुसऱ्याला मोठे होऊ द्यायचे नाही. यांच्या पक्षामध्ये घराणेशाही असल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे. यावेळी ते पुणे येथे माध्यमांशी बोलत होते. यांना दुसऱ्याला मोठं करायचं नाही. दुसऱ्याने तयार केलेल्या संस्थेमध्ये घटना बदलून तुम्ही […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 08T121216.784

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 08T121216.784

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे. यांना दुसऱ्याला मोठे होऊ द्यायचे नाही. यांच्या पक्षामध्ये घराणेशाही असल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे. यावेळी ते पुणे येथे माध्यमांशी बोलत होते.

यांना दुसऱ्याला मोठं करायचं नाही. दुसऱ्याने तयार केलेल्या संस्थेमध्ये घटना बदलून तुम्ही अध्यक्ष होता. त्यामुळे तुमचा पक्ष तुम्ही दुसऱ्याला देऊच शकत नाही. सामनामध्ये लिहलेलं खरं आहे. शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच राहणार आहेत. मला हे माहित होतं. पण मी यावर बोलणं टाळत होतो, असे ते म्हणाले आहेत.

Sharad Pawar मोठे नेते पण… वारसदार निर्माण करण्यात अपयशी, सामनातून परखड टीका

तसेच कधी-कधी आपला पक्ष टिकवण्यासाठी अशा नौटंक्या कराव्या लागतात, असा टोला देखील शरद पवारांना लगावला आहे. लोकशाही ही फक्त भारतीय जनता पक्षामध्येच आहे. या पक्षामध्ये चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. माझ्यासारखा बूथवर काम करणारा माणूस राज्याचा अध्यक्ष होऊ शकतो, असे ते म्हणाले आहेत.

राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहे. हा राष्ट्रवादीचा तीन दिवासांचा कार्यक्रम म्हणजे तमाशातील वगनाट्य होतं. ही तयार केलेली स्क्रिप्ट होती. तीन दिवस प्रसार माध्यमातून त्यांनी नौटंकी केली, असा टोला त्यांनी लगावला आहे. रयत शिक्षण संस्थेची घटना बदलली, साखर कारखाने ताब्यात घेण्यासाठी काय-काय केले हे सगळ्यांना माहित आहे, अशी टीका त्यांनी शरद पवारांवर केली आहे.

boat Accident : केरळमध्ये भयावह दुर्घटना, पर्यटकांची नाव उलटून 21 जणांचा मृत्यू

Exit mobile version