BMC Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच मुंबईचं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. महापौर पदावरुन भाजप आणि शिवसेना ठाकरे गटा दरम्यान आरोप – प्रत्यारोप सुरु असताना भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी महापौर पदावर मोठा दावा करत मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांच्या वक्तव्यानंतर भाजपवर (BJP) चारही बाजूने जोरदार टीका होताना दिसत आहे. नुकतंच ठाकरे बंधूंनी मराठी माणसांच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येत शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) आणि मनसे (MNS) युतीची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Election) शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. तर काँग्रेस या निवडणुकीत स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
नेमकं काय म्हणाले भाजप नेते कृपाशंकर सिंह ?
माध्यमांशी बोलताना मिरा भाईंदरसह 29 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त करत उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असं वक्तव्य केले आहे. उत्तर भारतीय नगरसेवक येणार. आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय समाजाचा महापौर बनेल असं कृपाशंकर म्हणाले. भाजप नेते कृपाशंकर यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाते नेते सचिन आहिर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कृपाशंकर सिंह यांचे वक्तव्य मराठी माणसाला अपमानीत करण्याचे असून यांचा माज निवडणूकीमध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सचिन आहिर यांनी दिला आहे.
वंचितने दिला काँग्रेसला धक्का, मुंबईत तब्बल 16 जागांवर उमेदवारच नाही; कारण काय?-
भाजपच्या हिंदी भाषिक असलेल्या नेत्यांची एवढी हिंम्मत, म्हणजे हा एका प्रकारे माज आहे का? कारण एवढी संख्या आणून किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्या प्रकारे चेतावनी देता किंबहुना एका प्रकारे आव्हानात्मक बोलले जाते मला असे वाटते यातूनच कळतय की, आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवर प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषेची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावर अपमानीत करण्यासारखी गोष्ट आहे. ह्यांचा हा माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीत उतरवल्याशिवाय राहणार नाहीत असं माध्यमांशी बोलताना सचिन अहिर म्हणाले.
