Download App

जिल्हा विभागल्यास राजकीय ताकद कमी होणार; सुजय विखेंनी थेट सांगितले

Sujay Vikhe :  भाजपचे नेते आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा विभाजनाला विरोध दर्शविला आहे. यामुळे जिल्ह्याची राजकीय ताकद कमी होईल, असे विखे म्हणाले. अहमनदर जिल्हा हा सगळ्यात मोठा जिल्ह्यात एकुण 14 तालुक आहेत. त्यामुळे प्रशासनावर खुप ताण पडतो. यामुळे शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यात आले. यावर सुजय विखेंनी भाष्य केले आहे.

जनतेच्या सोयीसाठी आणि शिर्डी मध्ये येणाऱ्या व्हीआयपी आणि प्रोटोकॉल असलेल्या व्यक्तींसाठी महसूलचे कर्मचारी अडकून पडतात म्हणून शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी सुरू होत आहे , याचा अर्थ जिल्हाधिकारी कार्यालय हलवणार असा होत नाही, असे विखे म्हणाले.

https://letsupp.com/politics/bjp-leader-sujay-vikhe-ahmadnagar-60113.html

यामुळे विभाजनाचा प्रश्न येत नाही जिल्हा विभाजन करण्यास माझा विरोध आहे. हा माझा व्यक्तिगत विरोध आहे, जिल्हा विभाजन झाल्यास त्याचा राज्यावर अतिरिक्त भार पडेल आणि अहमदनगर जिल्ह्याची राज्यात असलेली राजकीय ताकद कमी होईल, असेही सुजय विखे म्हणाले.

दरम्यान, शिर्डी येथे झालेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामुळे आता जिल्हा विभाजन होणार नाही, असे बोलले गेले. तसेच  श्रीरामपूरला नवीन जिल्हा घोषित करावा आणि शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला विरोध म्हणून श्रीरामपूर येथे बंद पाळण्यात आला होता.

पंजाबचं तूप, गुजरातचं मीठ मोदींनी बायडेन यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये महाराष्ट्रातील ‘ही’ वस्तू

तसेच काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी अहमदनगरचे नाव बदलून पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचा निर्णय झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

 

Tags

follow us