Download App

Sharad Pawar Retirement : पवारांच्या निवृत्तीवर राणेंचं विधान; म्हणाले अजितदादांना…

Sharad Pawar Retirement :  भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवृत्तीवर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी काल आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. काल मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपण निवृत्त होणार असे जाहीर केले आहे. यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता पवारांच्या निवृत्तीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आण‍ि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या अध्‍यक्षपदी सुध्‍दा हवेत! असे ट्विट त्यांनी काल केले होते. यावर त्यांनी आज पुन्हा भाष्य केले आहे. मला पवार साहेबांविषयी जे भाष्य करायचे होते ते मी केले आहे. आता त्याचा अर्थ तुम्ही लावा, असे ते म्हणाले आहेत.

Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप

तसचे मी एक राजकीय नेता आहे. मी दुसऱ्या पक्षातील भाजपचा नेता आहे. मला जे वाटलं ते मी बोललो. त्याचा अर्थ, स्पष्टीकरण मी देणार नाही. अजित पवार काल तिथे मोठ्यामोठ्याने भाषण करत होता. अजित पवारला त्यांनी निर्णय योग्य वाटत होता. तर कार्यकर्त्यांना त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा वाटत होता. त्याच्यामध्ये मी पवार साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष हवेत असे म्हटले आहे. त्यामुळे ज्याला जो अर्थ काढायचा तो काढा, असे राणे म्हणाले आहेत.

Bhaurao Karhade: मोठी बातमी! ‘माफ करा ‘TDM’ प्रदर्शन थांबवतोय’ दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचा मोठा निर्णय

तसेच शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये शिवसेनेतील बंड शमवण्यात उद्धव ठाकरे अयशस्वी ठरले असे म्हटले आहे. यावर देखील ते बोलले आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे हे असमर्थ ठरले. मोजक्या वेळेस मंत्रालयात जाऊन देखील शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलेच, असेही ते म्हणाले आहे.

Tags

follow us