…तर मी ठाकरेंचे कपडे टराटरा फाडील, राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

Nitesh Rane On Sanjay Raut :  भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आजपासून नितेश राणे यांची संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषदेला प्रत्युत्तर म्हणून पत्रकार परिषद होणार आहे. आज सकाळीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नितेश राणे यांनी आपली पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 27T115328.280

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 27T115328.280

Nitesh Rane On Sanjay Raut :  भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आजपासून नितेश राणे यांची संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषदेला प्रत्युत्तर म्हणून पत्रकार परिषद होणार आहे. आज सकाळीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नितेश राणे यांनी आपली पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आम्ही ओरिजिनल शिवसैनिक म्हणून मोठे झाले आहोत. आम्ही राऊतांसारखे चायनिज मॉडेल नाही. त्यामुळे राऊतांनी इथून पुढे विचार करुन आमच्या नेत्यांवर बोलावे. राऊतांसारखी माणसे बाजारात स्वस्तात विकत मिळतात. त्यांनी आमच्या नेत्यांवर काही बोलल्यास मी अर्ध्या तासात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे कपडे टराटरा फाडील, असे म्हणत राणेंनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा

शिंदे व फडणवीस यांच्यावर बोलण्याची राऊतांची लायकी नाही. राऊत तुम्ही अजून राणेंना ओळखलेले नाही. त्यामुळे यापुढे विचार करुन बोलायचे. जर फडणवीसांबद्दल काही बोललास तर मी ठाकरेंचे कपडे फाडील, असा घणाघात नितेश राणेंनी केला आहे.

राऊत हे सत्यपाल मलिक यांना भेटणार आहेत. मलिकांविषयी पाकिस्तान गोडवे गात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याचे काम मलिक करत आहे आणि अशा व्यक्तीला राऊत  भेटणार आहेत. त्यामुळे माझी अशी मागणी आहे की राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी मी करत आहे, असे राणे म्हणाले आहेत.

प्राजक्त तनपुरेंवर सुजय विखेंचा हल्लाबोल, ‘एकदाही कारखाना नफ्यात चालवला नाही’

तसेच पत्राचाळीतीली माणसे ही काय पाकिस्तानी होती का असा सवाल त्यांनी केला आहे. पत्राचाळीतल्या माणसांना यांनी बेघर केले. त्यांन रस्त्यावर आणले आणि आता बेळगावला चालाला आहे, अशा शब्दात राणेंनी राऊतांना सुनावले आहे. हा स्वत जामीनावर बाहेर आहेस. तुला कधीही आतमध्ये टाकतील. त्यामुळे आजपासून चौकटीत रहायचे, अशी ताकीद राणेंनी राऊतांना दिली आहे.

Exit mobile version