Download App

“जावईबापू, तुमची स्वप्ने फक्त भाजपच पूर्ण करु शकतो” : कर्डिलेंचे संग्राम जगतापांना जाहीर आमंत्रण

अहमदनगर : “राजकारणात कधी, कुठे जावे लागेल हे सांगता येत नाही. तुमचा पक्ष तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. तुमची स्वप्ने फक्त भाजपच पूर्ण करू शकतो, असे म्हणत भाजप नेते शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी शहराचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये (BJP) येण्याची ऑफर दिली. ते माजी सभापती कुमार वाकळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते. (BJP leader Shivajirao Kardile indirectly offered Sangram Jagtap, MLA of the city’s Nationalist congress (Ajit Pawar) faction, to join the BJP.)

कर्डिले म्हणाले, कोणाला कधी कोणत्या पक्षात जावे लागेल याची खात्री नाही. त्यामुळे आता पुढे पक्षाचा उल्लेख करू नका. पण तुमचा पक्ष तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. तुमची स्वप्ने फक्त भाजपच पूर्ण करू शकतो. मंत्रिपदाची संधी फक्त भाजपच देऊ शकते. महापालिकेत भाजपचे फक्त 14 नगरसेवक निवडून आले होते. तरीही महापौर आणि उपमहापौर भाजपचे झाले. पुढे आम्ही राष्ट्रवादीला मदत करत त्यांची सावड फेडली, असेही त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis : शिंदे अन् अजितदादांना सोबत का घेतलं? फडणवीसांनी सांगूनच टाकलं

कुमार वाळकेंचेही कौतुक :

यावेळी कर्डिले यांनी उत्सवमुर्ती कुमार वाळके यांच्या कामाचेही कौतुक केले. वाकळे यांनी महापालिकेत चांगले काम केले.भाजपमुळे त्यांना सभापतिपदाची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. अमृत योजनेसारखी कामे मार्गी लागली. या योजनेमुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे.

NCP News : शरद पवारांचा शिर्डीत मुक्काम! राष्ट्रवादीच्या शिबिरातून लोकसभेची मांडणी?

बोल्हेगावसारख्या ठिकाणी चालण्यासाठी साधे रस्ते नव्हते. त्यामुळे यापूर्वी या भागात कोणी वास्तव्यास तयार नव्हते. तिथेही त्यांनी चांगले काम करून दाखविले. या परिसरात मोठे दत्त मंदिर उभे राहिले आहे, मंदिरांमुळे लोक एकत्र येतात. वाळकेंमुळेच बोल्हेगावचा चेहरा मोहरा बदलला असा दावा यावेळी कर्डिले यांनी केला.

follow us

वेब स्टोरीज