Download App

Video : मंत्रिपद नाही पण कामांची मोठी यादी; जातीय राजकारणावरही मुनगंटीवारांचं भाष्य, पाहा व्हिडिओ

राजकारण हे जातीय आधारावर नसाव कर्तृत्वावर असाव. जे लोक आपल्या जातचे ओएसडी आपल्या जातीचे ठेवत असतील तर ते चूकच आहे.

  • Written By: Last Updated:

BJP leader Sudhir Mungantiwar Exclusive : भाजपमधील राज्य पातळीवरील प्रमुख चेहरा असलेले नेते सुधीर मुनगंटीवार हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आहेत का ? अशी अनेकार्थाने चर्चा सुरू आहे. (Mungantiwar ) त्यांनी त्यावर वेळोवेळी भाष्य केलं आहे. मात्र, नुकतीच लेट्सअप मराठीवर संपादक योगेश कुटे यांनी मुनगंटीवार यांना अनेक विषयावर बोलत केलं आहे. तसंच, त्यांनी मंत्रिपदावरूनही दिलखुलास भाष्य केलं आहे.

राजकारण हे जातीय आधारावर नसाव कर्तृत्वावर असाव. जर लोक आपल्या जातीचे ओएसडी ठेवत असतील तर ते चूकच आहे. आपण रुग्णालयात जातो तेव्हा डॉक्टरच्या जातीचा कुठं आपण विचार करतो? बसमध्ये चढताना आपण कुठं विचार करतो? असे प्रश्न उपस्थित करत मुनगंटीवार यांनी जातीय राजकारणावर सडेतोड भाष्य केलं.

Video : भाजप एकनाथ शिंदेंचाही पक्ष फोडणार? मुनगंटीवार भाजपवरच पाहा पूर्ण सविस्तर मुलाखत

मला अनेक काम करायचे आहेत. त्यामध्ये मला शिव भक्तांना एकत्र कराचं आहे. तसंच, मला महाराष्ट्रही फिरायचा आहे. कारण कॉलेज जिवनातच मी राजकारणात आल्याने कामाच्या व्यापात असा मी फिरलो नाही. त्यामुळे धारावीपासून मी आता फिरणार आहे असंही मुनंगटीवार यावेळी म्हणाले. तसंच, सुमारे २०० चित्रपट मी आयपॅडमध्ये घेऊन ठेवले आहेत तेही पाहायचे आहेत असंही मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी मुनगंटीवार यांनी आपली मुलगी राजकारणात येणार का नाही यावरही थेट भाष्य केलं आहे. माझ्या मुलीला मी वेळ देऊ शकलो नाही. राजकारणात अनेक कामांमुळे ते शक्य झालं नाही. त्यामुळे जर मुलगी राजकारणात येणार असेल तर तीने जरूर यावं असं म्हणत तीला राजकारणाचे दारं उघडे आहेत असंही यावेळी त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर अनेक गोष्टी करायच्या आहेत त्या आता करणार आहे असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

follow us