Video : भाजप एकनाथ शिंदेंचाही पक्ष फोडणार? मुनगंटीवार भाजपवरच… पाहा पूर्ण सविस्तर मुलाखत
BJP leader Sudhir Mungantiwar Exclusive : भाजपमधील राज्य पातळीवरील प्रमुख चेहरा असलेले नेते सुधीर मुनगंटीवार हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आहेत का ? अशी अनेकार्थाने चर्चा सुरू आहे. (Mungantiwar) त्यांनी त्यावर वेळोवेळी भाष्य केलं आहे. मात्र, नुकतीच लेट्सअप मराठीवर संपादक योगेश कुटे यांनी मुनगंटीवार यांना अनेक विषयावर बोलत केलं आहे. तसंच, त्यांनी मंत्रिपदावरूनही दिलखुलास भाष्य केलं आहे.
भाजपमध्ये एक मंत्रिपद खाली असून तिथं आपलं नाव येण्याची शक्यता आहे असा प्रश्न विचारला असता मुनगंटीवार म्हणाले, हे तुमचं मोठेपण आहे. तुम्ही हितचिंतक आहात. यावेळी मुनगंटीवार यांनी हसत हसत हा विषय टाळल्याचंही दिसलं नाही. याचवेळी सांस्कृतीक खातं ज्यांच्याकडं गेलं त्या आशीष शेलार यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, ते माझे खूप चांगलो मित्र आहे. तसंच, मला मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे ज्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यामध्ये आशीष होता असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
CM चंद्रपुरात सुधीरभाऊ मुंबईत, कार्यक्रमालाही दांडी; मुनगंटीवारांनी सगळचं सांगितलं..
यावेळी गेली अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यांचा पक्ष फोडण्याचीही भाजपमध्ये चर्चा आहे असं विचारलं असता मुनगंटीवार यांनी थेट भाष्य केलं. ते म्हणाले एकनाथ शिंदे एक चांगले नेते आहेत. सत्तेत असताना ते आमच्याकडं आले. हे सगळं अस असताना जर त्यांचा पक्ष फोडण्याचा विचार केला तर ते वाईट होईल. आपण असं वागलो तर भविष्यात आपल्याकडून व्याजासकट वसूल केलेलं दिसेल इतक्या सडेतोडपणे मुनगंटीवार बोलत होते.
यावेळी त्यांना अजित पवार यांच्याबद्दल विचारलं असताना अजित पवारांनी बिबिषणाची भूमिक पार पाडली असं मुनगंटीवार म्हणाले. ते चांगले प्रशासक आहेत. त्यावेळी आम्हालाही एकाला एक अधिकची गरज होती. अजित पवार हे एक अधिकची ताकद आहेत. त्यामुळे सत्ता टिकवण्यापेक्षा माणसं टिकवणं हे महत्वाचं आहे असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
यावेळी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही भाष्य केलं. मुनगंटीवार यांनी शायरीतून उद्धव ठाकरेंवर भाष्य केलं. “दोस्ती तोडते समय एक ऐसी गुंजाईस रखीये जब मीले तो शरमाना ना पडे” काय झालं उद्धव ठाकरे यांना हे माहिती नाही. १६१ विधानसभा जिंकल्या होत्या त्यामुळे सरकार होणार होत. मात्र, त्यांनी अल्पकाळाचा फायदा पाहिला असं म्हणत टोला लगावला. अखेर, बेईमानांना एकनाथ शिंदे यांना पुढं करून देवाने धडा शिकवला असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.