Sudhir Mungantiwar: अर्थ समजला नसेल तर ‘नानां’ना विचारा

Sudhir Mungantiwar: अर्थ समजला नसेल तर ‘नानां’ना विचारा

Sudhir Mungantiwar: छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखे येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये लंडन येथून आणण्यात येणार आहे. याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली होती.

यावर नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी ट्विट (Tweet) केल्याचे बघायला मिळाले होते. नाना पाटेकर ट्विट करत म्हणाले होते (Social media) की, मुनगंटीवार महाराजांची वाघनख आणताय त्या बद्दल अभिनंदन… जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा…. असे नाना पाटेकर यांनी लिहिले होते. यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

https://x.com/nanagpatekar/status/1700377095044809093?s=20

मुनगंटीवार म्हणाले आहे की, नाना पाटेकर यांनी कोणतीही टीका केली नाही. त्यांनी मला फोन करून सांगितलं, मी तुमचं अभिनंदन करतो. सरकारच अभिनंदन करतो. या ट्विटमध्ये जे वाक्य वापरतो ते कोणासाठी आणि कशासाठी वापरतो. ते ज्या लोकांनी हा देश लुटला त्याविरुद्ध कृती अपेक्षित असल्याचं ते म्हणाले होते. त्यांनी सरकारवर टीका केली नाही. तुम्हाला अर्थ समजला नसेल तर त्यांना विचारू शकता, असे सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी म्हणाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube