Download App

‘आहे का इथं कुणी माई का लाल…’ ; फडणवीसांना तोंडघशी पाडणारा मुनगंटीवारांचा व्हिडिओ व्हायरल

  • Written By: Last Updated:

Sudhir Mungantiwar Viral clip : राज्यात मागील काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षांच्या वाढीव शुल्कांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत या मुद्द्यावर सरकारला चांगलेच धारेवर धरलं होतं. तलाठी परीक्षेसाठी तब्बल १ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी प्रश्न विचारले होते. त्यावर परीक्षांचे गांभीर्य रहावे म्हणून शुल्क वाढविले असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समर्थन केलं होतं. अशात आता त्यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची एक व्हिडिओ क्लिप आता समोर आली. यात ते वाढीव शुल्काला विरोध करताना दिसत आहेत. (bjp leader sudhir mungantiwar video clip viral about examination fees)

नेमके काय आहे प्रकरण?

राज्य सरकारने देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ७५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. आता या भरती प्रक्रियेत पोलीस भरती आणि जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सुरू झाली. या भरतीसाठी परीक्षा शुल्क एक हजार ते ९०० रुपये आकारण्यात येत आहे. मात्र हे शुल्क म्हणजे बेरोजगारांची थट्टाच असल्याची प्रतिक्रिया परिक्षार्थी देत आहेत.

केंद्र तसेच राज्य लोकसेवा आयोग पदभरतीसाठी माफक शुल्क आकारतात. खासगी संस्था मात्र हजारो रुपयांचे शुल्क घेतात. याच वाढीव शुल्काचे पावसाळी अधिवेशनात तीव्र पडसाद उमटले. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी परिक्षांचे गांभीर्य रहावे म्हणत वाढीव शुल्काचे समर्थन केले होते.

मात्र आता सुधीर मुनगंटीवार यांनी 2021 मध्ये विरोधी पक्षात असताना केलेल्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.  या ते फी वाढीला विरोध करताना दिसत आहेत. यामुळे वाढीव शुल्काचे समर्थन करणाऱ्या फडणवीसांची चांगलीच अडचण झाल्याचे बोलले जात आहे.

काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार?

या व्हिडिओमध्ये मुनगंटीवार यांनी फी रकमेवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होते. यात ते म्हणतात, गरीब विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात आहे. खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये आणि एससी-एसटी-ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 400 रुपये शुल्क आकारले जात आहे. कुण्या मंत्र्याचा मुलगा जाणार आहे का एसटी किंवा आरोग्य विभागात नोकरीसाठी? असा सवाल त्यांनी केला.

Mumbai-Goa Highway : 13 वर्षांहून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाईन 

दरम्यान, यावेळी त्यांनी सभागृहात आमदारांना आव्हान दिलं की, “आहे का इथं एकतरी माई का लाल, जो म्हणेल की, माझा मुलगा क्लास थ्रीची नोकरी करेल?” मुनगंटीवार यांचे भाषण तेव्हा गाजले होते. मात्र, सत्तारूढ होताच फडणवीस यांनी एक हजार रुपये शुल्काचे एक प्रकारे समर्थन केल्यानं मुनगंटीवर यांची गोची झाली. तर मुनगंटीवार यांची जुनी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं फडणवीस यांची फजित होताना दिसत आहे.

Tags

follow us