Download App

गोपीनाथ मुंडेंची एक भेट अन् काँग्रेसने उमेदवाराचे तिकीटच कापले; तावडेंनी सांगितला खास किस्सा

Vinod Tawade On Gopinath Munde :  भाजपचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा आज ( 3 जून ) रोजी स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे हे कसलेले राजकारणी होते. त्याचबरोबर शोषत व वंचित घटकाची काळजी करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. आपल्या भाषणातून समोरच्याला चिमटे काढणे ही त्यांची खासियत होती. विरोधी पक्षातील विलासराव देशमूख, छगन भुजबळ यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते.

आजही अनेक जण त्यांच्या आठवणी सांगत असतात. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविषयीचा एका खास किस्सा सांगितला आहे.  ते मुंबई तक या वृत्त वाहिनीशी बोलत होते. तावडेंनी सांगितलेल्या या किस्स्यामुळे गोपीनाथ मुंडे हे किती कसलेले राजकारणी होते याच झलक दिसून येते.

‘2019 मध्ये शिवसेनेशी युती केली तिथं भाजपचं चुकलंच’; विनोद तावडेंनी दिली जाहीर कबुली

या कार्यक्रमात विनोद तावडेंना आदित्य ठाकरेंविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यांचा गेल्या 10 महिन्यातील प्रवास तुम्ही कसा पाहता, त्यांनी सत्ता गेल्यावर राज्यामध्ये यात्रा काढली होती, यावर तुमचे मत काय असे त्यांना विचारण्यात आले. यावर तावडे म्हणाले, राजकारण हे इव्हेंटने होत नाही. टीव्ही आणि पेपरमध्ये जास्त दिसणं यापेक्षा तुम्ही लोकांमध्ये जास्त दिसणं महत्वाचे आहे. यातून तुम्ही लोकांच्या मनात जास्त जाता. कुठल्याही पक्षाचं का असे ना पण, तरुण नेतृत्व उभं राहिले पाहिजे, हे सांगताना त्यांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण सांगितली.

2004 सालची विधानसभा निवडणूक होती. त्यावेळी मी मुंडे साहेबांबरोबर एका जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर होतो. तिथे मोठी सभा झाली. यानंतर आमच्या भाजपच्या नेत्यांच्या भेटी ठरल्या होत्या. पण मुंडेसाहेब म्हणाले की, आपल्याला एका काँग्रेसच्या नेत्याकडे जायचे आहे. त्या काँग्रेसच्या नेत्याची भेट झाल्यानंतर आम्ही विमानाने मुंबईला आलो. त्यानंतर ते म्हणाले की, या पेपरला फोन करुन सांग की, मुंडे या काँग्रेसच्या नेत्याला भेटले आणि भाजप त्यांना तिकीट देणार असं जाहीर करायला सांग, मी तसं केलं.

Coromandel Express Accident : 42 वर्षांमधील भारतातील सर्वात मोठे रेल्वे अपघात, उत्तर प्रदेशमध्ये झाली सर्वाधिक हानी

यानंतर काँग्रेसने या उमेदवाराचे तिकीट कापले. काँग्रेसकडून त्या नेत्याला तिकीट मिळणार होते. जर त्याला तिकीट मिळालं असतं तर आमचा उमेदवार हरला असता. हे जे कसब लागतं ना ते इव्हेंटच्या नंतरचे आहे, असे म्हणत विनोद तावडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.

Tags

follow us