मोदी-शाहांच्या चेहऱ्यावर तिकिट विसरा! भाजपच्या बड्या नेत्याने इच्छुकांना सांगितला क्रायटेरिया

BJP Leader Sanjay Kakade On Tickit Declaration :  भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये होत आहे. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. यासाठी खास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित राहणार आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीली विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राज्यातही आगामी काळात स्थानिक […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 18T123816.326

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 18T123816.326

BJP Leader Sanjay Kakade On Tickit Declaration :  भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये होत आहे. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. यासाठी खास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित राहणार आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीली विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राज्यातही आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तसेच पुढीलवर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी या बैठकीत कुणाला कोणती जबाबदारी मिळते ते पाहणे देखील महत्वाचे राहणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व माजी खासदार संजय काकडे यांनी महत्वाचे विधान केले आहे.

कर्नाटक निवडणुकीत आमचा पराभव झालेला आहे. तिथे उमेदवाराचा चेहरा देताना आमच्या चुका झालेल्या आहेत. कारण तिथे आमचे 11 कॅबिनेट मिनिस्टर पराभूत झाले आहेत. ही राज्यास्तरावरती धोक्याची घंटा आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आम्ही नक्कीच काळजी घेऊ, असे सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

Bullock Cart Racing : भिर्रर्र… ! बैलगाडा शर्यतीवर ‘सर्वोच्च’ निर्णय : ग्रामीण भागात आनंदाचं वातावरण

ज्या मंत्र्यांचा काहीही कामाचा आढावा नाही, ज्या मंत्र्यांचे काहीही काम नाही. ज्या आमदारांना परत निवडून येण्यासाठी हवं तितक्या क्षमतेने काम केले नाही अशा ठिकाणी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फेरबदल होतील असे संजय काकडेंनी सांगितले. माझं असं मत आहे की, प्रत्येक मंत्र्यांने जिल्ह्यातील जास्तीत जास्त आमदार निवडून आणले पाहिजे. प्रत्येक मंत्र्याला एक जिल्हा दिला जाईल. तो किती आमदार निवडून आणू शकतो याचा विचार केला जाईल. तिकीट देताना त्याला विचारले जाईल. त्यानी सांगितलेले आमदार निवडून नाही आले तर पुढच्यावेळेस त्यांचे मंत्रीपद धोक्यात येईल, असे ते म्हणाले आहेत.

Sanjay Raut : जे.पी. नड्डांचा मुंबईशी काय संबंध? उगाच लुडबुड करु नये

त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्री किंवा आमदार याने किती काम केले आहे, त्याचा फेस कसा आहे, जनतेमध्ये त्याची धारणा काय आहे, या सर्व गोष्टींचा विचार केला जाईल. असा विचार करुन तिकीटवाटप केले जाईल. ज्याची स्वतची 2 ते अडीच लाख मते आहेत किंवा ज्याची 40 हजार मते विधानसभेला आहेत त्यालाच तिकीट देण्यात येईल. फक्त मोदी साहेबांनी किंवा अमित भाईंनी किती कष्ट करायचे, हे देखील ठरवले जाईल. स्थानिक उमेवाराचे काही आहे की नाही. त्यामुळे या सर्वाचा विचार करुन तिकीट वाटप केले जाईल.

Exit mobile version