Download App

मोदींनी तुझ्या बापाला 6 हजार पेरणीला दिलेत; लोणीकरांची जीभ घसरली, राजकीय वर्तुळात खळबळ

BJP MLA Babanrao Lonikar Controversial Statement On Trollers : भाजपचे (BJP) परतूरचे आमदार बबनराव लोणीकर हे अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावर सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)यांची जीभ घसरली आहे. लोणीकर हे मोदींचे अंधभक्त आहेत, अशी टीका काही जणांनी केली होती, त्यांच्यावर टीका करताना लोणीकरांचा तोल गेलाय. आपल्या भाषणातून लोणीकरांनी सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर टीका केली. परंतु हेच आता त्यांना ( Maharashtra Politics) जड जात असलेलं दिसतंय.

कुचरवट्यावर रिकामटेकडी कार्टी

जालना जिल्ह्यातील परतुर येथे हर घर सोलर योजनेचा शुभारंभ कार्यक्रम होता. यावेळी भाषणामध्ये बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचं लिहितात. याच कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाची पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केलाय, असं लोणीकरांनी म्हटलंय.

रक्तरंजित संध्याकाळ! पार्टीत गॅंगवार, अंदाधुंद गोळीबारात 12 जणांचा मृत्यू

लोणीकर नेमकं काय म्हणाले?

तरूण पोरं कुचरवट्या बसतात अन् म्हणतात सरकारने काय केलं? तुझ्या गावात जे आलं ना, ते बबनराव लोणीकरनेच 25 वर्षांत दिलं. नरेंद्र मोदींनी सहा हजार रूपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या आईच्या, बायकोच्या, बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आहेत. तुझ्या पायातले बुट, चप्पल आमच्यामुळे आहेत. तुझ्या हातातील मोबाइलचं डबडं देखील आमच्याच सरकारमुळे आहे. आमचंच घेतो, अन् आमच्याच तंगड्या वर करतो. आमच्यावर लिहितो. तुमच्या आमदाराच्या काळात असं काय होतं का? असा देखील सवाल लोणीकरांनी केलाय.

तावरेंची ‘दादांना धोबीपछाड’; वयावरुन हिणवलं…पण चंद्रराव तावरेंनी सांगवी गटात बाजू सारली

याआधी देखील बबनराव लोणीकर यांनी एका सभेमध्ये बोलताना ग्रामस्थांना इशारा दिलेला होता. विधानसभा निवडणुकीत लीड मिळाली नव्हती, तेव्हा लोणीकरांनी बोरगावात बोलताना म्हटलं होतं की, ‘5 वर्षांत कमळाचं एक बटन दाबायचं तेही केलं नाही. गावाला मी 8 कोटींचा सिमेंट रोड दिला. मला मत द्या किंवा नका देऊ. मी दोन ते तीन वेळेस चव पाहणार, नाहीतर गावावर फुली मारणार ’, असं लोणीकर यांनी म्हटलं होतं.

 

follow us