…तर तुमच्या गावाला निधी वाटपात फुली मारेन, मताधिक्य घटल्याने आमदार लोणीकर संतापले

मतदान केलं नाही तरी निधीसाठी एक, दोन किंवा तीन वेळेस पैसे देईन. पण जर असं वारंवार होत राहिलं तर गावाला निधी देण्यास फुली मारेन

Babanrao Lonikar

Babanrao Lonikar : परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांचं एक वादग्रस्त विधान समोर आलं. बोरगाव नावाच्या गावात एका भर कार्यक्रमात लोणीकरांनी कमी मते मिळाल्याने गावकऱ्यांना सुनावले. मतदान केलं नाही तरी निधीसाठी एक, दोन किंवा तीन वेळेस पैसे देईन. पण जर असं वारंवार होत राहिलं तर गावाला निधी देण्यास फुली मारेन, असं ते म्हणाले.

विधान भवनात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन, उद्यापासून सुरू होणार संसद अन् राज्यांच्या अंदाज समित्यांची परिषद 

बबनराव लोणीकर परतूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ए.जे. बोराडे यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली. परिणामी लोणीकर यांचा केवळ ४७४० मतांनी विजय झाला. विधानसभा निवडणुकीत मताधिक्य घटल्यामुळे बोरगाव येथील सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजन समारंभात लोणीकर यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. ते म्हणाले की, मोठं गाव म्हणून हे गाव मी माझ्याकडे घेतलं होतं. पूर्वी हे गाव माझ्या मतदारसंघात नव्हतं. पण ते आल्यापासून या गावाचा जो विकास झाला, या गावाला जो निधी मिळाला, तो मीच दिला. त्यामुळं खात्री होती की या गावात आम्हाला ५० ते ६० टक्के मते मिळतील. पण पांगलं गाव. पोरंसोरं उधळले. काही जण मशालीकडे गेले, काही इकडे गेले, काही तिकडे गेले. आता मला सांगा, मी तुमच्या गावाला ८ कोटी देतो. आणि ८ कोटींच्या गावात बबनराव मतांमध्ये मागे कसं काय? असा सवाल लोणीकर यांनी केला.

ठाकरे गटात लेटर बॉम्बचा धमाका! बड्या नेत्याने ठाकरेंची साथ सोडली; पत्रात खळबळजनक दावे 

मी ५ वर्षांतून एकदा फुली मागायला येतो. पूर्वी १२ बलुतेदार होते. आमचं बलुतं हे ५ वर्षांत एकदा कमळाचे बटण दाबायचं. ते तुम्ही केलं नाही. तुम्ही दुसऱ्यांच्या मागे गेलात.
आता जे झलं ते जाऊ द्या. पण आमचे काही कार्यकर्ते नाराज झाले. मी त्यांना विचारले, आपण निधी थांबवावा का? ८० टक्के मते देणाऱ्या गावांना निधी द्यावा का? ते म्हणाले, भाऊ, एवढ्या वेळेस जाऊ द्या, रोड करून टाका, असं बबनराव लोणीकर म्हणाले.

मला मतदान केलं नाही तरी ५ ते १० कोटी रुपये देत राहीन. मी एकदा चव पाहिन, दोनदा आणि तीनदा पाहीन, नंतर म्हणेन, फुली हाना. ही वेळ येऊ देऊ नका , असा इशारा बबनराव लोणीकर यांनी दिला.

follow us