माझ्या पाठीमागे शनी होता, मी शनीची पूजा करून आलो, बबनराव लोणीकरांनी दानवेंना काढले चिमटे

  • Written By: Published:
माझ्या पाठीमागे शनी होता, मी शनीची पूजा करून आलो, बबनराव लोणीकरांनी दानवेंना काढले चिमटे

Babanrao Lonikar on Ravsaheb Danve : जालन्यात भाजपामध्ये रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर अशी दोन समीकरण आहेत. एका पक्षात जरी असले तरी दोघांचं गणित मात्र वेगळं आहे. (Babanrao Lonikar) पक्षाची जिल्हा कार्यकर्णी ही वेगळी, अशात दानवे यांचा लोकसभेत पराभव झाला. दरम्यान, विधानसभेत निवडून आलेल्या बबनराव लोणीकर यांनी सत्कार समारंभात रावसाहेब दानवे यांना चक्क शनी आणि शकुनी मामाची उपमा देऊन बारीक चिमटे घेत त्यांच्यावर बोचरी टीका केलीय.

सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात लोणीकर यांनी भाषांना दरम्यान महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. त्यांच्यासाठी मंत्रीपद असते अस म्हणत माझ्या पाठीमागे शनी होता. मी शनीची पूजा करून आलो. पण, आमचा सर्जेराव मात्र माझ्यामागे भोकरदनचा शनी होता अस समजतो. परंतु, मी इकडचा शनी म्हणतो मी अस म्हणत रावसाहेब दानवे यांचं नाव न घेता दानवेंना इशाऱ्या इशाऱ्यात चिमटा काढत दानवे यांनी आमच्या भागात खूप कट कारस्थान केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ रावसाहेब दानवे मैदानात; वांबोरीत घेतली भव्य सभा, म्हणाले

बबनराव पडल्याशिवाय तुम्हाला आमदार होता येत नाही अस म्हणत जेव्हढे कारस्थान या शकुनी मामांनी करायचं तेव्हडं केलं. हे सगळे डोमकावळे उडाले अस म्हणत लोणीकर यांनी रावसाहेब दानवे यांना शकुनी मामाची उपमा देत त्यांच्यावर बोचरी टीका केली. दरम्यान, रावसाहेब दानवे हे आपल्या मुलाला मंत्रीपद मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे लोणीकर यांनी देवेंद्र फडणवीस मुखमंत्री होतील त्यांना मी भेटून आलो आहे. या सरकारमध्ये मला मंत्री पदाची संधी द्यावी अस मी देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगितलं आहे. मी मराठवाड्यातील एकमेव पाचव्यांदा आमदार आहे. मी सगळ्यात सिनियर आहे 40 वर्षांपासून मी भाजपाचा कार्यकर्ता आहे असंही ते म्हणाले आहेत.

मी मंत्री म्हणून कधी तोऱ्यात वागलो नाही. मी 40 वर्ष निष्कलंक म्हणून वावरलो, कुठलाही एक रुपयाचा आरोप सुद्धा माझ्यावर झाला नाही. त्यामुळे मंत्री म्हणून मला संधी मिळावी असं मी ठासून देवेंद्र फडणवीस यांना सांगून आलो असल्याचं वक्तव्यही बबनराव लोणीकर यांनी रावसाहेब दानवे यांना उद्देशून केलं आहे. त्यामुळे देवेन्द्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात कुणाला संधी मिळते हे पाहणं तसंच दुसरीकडं लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर दानवे काय उत्तर देतात हे ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube