BJP MLA defeat to BJP MLA alliance with Congress who close to Fadnavis in Solapur APMC Election : कॉंग्रेस आणि भाजप हे अत्यंत विरोधी मानले जाणारे पक्ष मात्र हे समीकरण सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पुरतं उलट ठरलं आहे. कारण सोलापूर सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये फडणवीसांच्या अत्यंत जवळचे आणि लाडके मानल्या जाणाऱ्या आमदाराने थेट कॉंग्रेसच्या साथीनं स्वत:च्याच आमदारांना पराभवाची धूळ चारली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये 18 जागांसाठी मतदान झालं. रविवारी 27 एप्रिल मतदान पार पडले. त्यानंतर आज 28 एप्रिल रोजी सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अप्पासाहेब कादाडी सांस्कृतिक सभागृहात मतमोजणी पार पडली. यामध्ये फडणवीस यांचे जवळचे आणि लाडके मानले जाणारे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलला 14 जागांवर यश मिळवता आले. तर भाजपचे दुसरे आमदार असलेले सुभाष देशमुख यांच्या पॅनलचे केवळ चार जण विजय झाले आहेत.
पाकिस्तानला शहाणपण नडला! हवाई मार्ग बदलला; कोट्यवधींचं नुकसान, जाणून घ्या कसं?
निवडणुकीमध्ये भाजपचे सोलापूरमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं. कारण आमदार कल्याण शेट्टी यांच्या विरोधात भाजपचे दोन दिग्गज मंत्री एकत्र आल्यानंतर कल्याण शेट्टी यांनी थेट काँग्रेसची हात मिळवणी केली. त्यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी आमदार दिलीप माने व काँग्रेसचे सुरेश हसापूर यांच्या पॅनलने अकरा जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर आपली सत्ता आणली आहे.
त्यामुळे या निवडणुकीमध्ये अत्यंत विरोधी मानले जाणाऱ्या काँग्रेसच्या साथीने कल्याण शेट्टी यांनी थेट आपल्याच पक्षाच्या आमदारांचा पराभव केला. त्यामुळे यामध्ये भाजपचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पॅनलचा दारू पराभव झाला आहे.