Suresh Dhas on Massajog Crime : संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता. (Suresh Dhas ) त्यामुळे मी या प्रकारात जास्त सहभागी आहे. धनंजय मुंडे तुम्ही संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात समर्थन देत आहात का? आणि गोपीनाथ गडावरून हे बोलता? तुम्ही कोणत्या दुनियेत वागताय? तुमची स्टाईल कशी आहे धनु भाऊ? तुम्हाला सिरियसनेस काय आहे, हे गँग ऑफ वासेपूर असल्याची टीका करत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केलं आष्टी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजितदादांच्या भेटीनंतर सुरेश धसांचा गौप्यस्फोट; पीकविम्यात कोट्यावधींचा घोटाळा, रडारवर धनंजय मुंडे?
माधव जाधव प्रकरणात त्याची काय चूक होती?, कुठं गुन्हे दखल केले जात आहेत? डॉक्टर
वर गुन्हा दाखल केला हे खरं आहे का? आता पर्यंत किती प्रकरण झाले? बबन गिते खरचं आरोपी होता का? परळीत सांगतो या प्रकरणात किती आरोपी होते, या प्रकरणात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री लक्ष देणार नाही. धनंजय मुंडे आधी असे नव्हते काय? होतास तू काय झालास तू, असंही आमदार सुरेश धस म्हणालेत.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवी खुनाच्या प्रकरणात बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती केली आहे. काल रात्री मी एसआयटी (SIT) संदर्भात विचारणा केली आणि मुख्यमंत्री यांनी कालच पत्रावर सही केली. त्यामुळे लवकरच एसआयटी स्थापन होईल. संतोष देशमुख हत्या अमानवी घटना घडली आहे. मी न्यायालयाचे आभार मानतो. आरोपींना 15 दिवसांचा पीसीआर (PCR) मिळाला ही समाधानाची बाब आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्यासाठी गती मिळेल. आयजी लेवलचे अधिकारी, ज्युडिशिअल तपासणी होणार यासाठी मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतले आहे.
आता बीड जिल्हा एकवटणार आहे. गृहमंत्र्यांनी सकारात्मक निवेदन केलं आहे. जे उद्योग अधिकाऱ्यांनी केले आणि त्यांच्यावर कारवाई झाली, यावरून कायदा नावाची गोष्ट राहिली की नाही हा प्रश्न आहे. ॲक्शन आता सुरू झाली आहे. जे अधिकारी दिले त्यांचं काम समाधानकारक आहे. पोलीस, सीआयडीहे सर्व याचा तपास करत आहे. पोलीस उर्वरित आरोपींना अटक करतील. मात्र, या प्रकरणात अविश्वास दाखवून चालणार नसल्याचे म्हणत भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय.
या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे
छोटा आका आत गेला असून कराड 302 चे प्रमुख सूत्रधार आहेत. अराजकता परळीत जाऊन पहा, काय अवस्था आहे. यांना लवकर अटक करावी. एसआयटी स्थापन होईल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारावे किंवा अजितदादांनी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे. मागचे पालकमंत्री होते त्यांनी पालकमंत्री पद आणि मंत्रीपद भाड्याने दिले होतं.
मी पण 28 तारखेच्या मोर्चाला उपस्थित राहणार आहे. मी घाबरत कोणालाच नाही. अका 302 मध्ये सुध्दा आहे. परळीतील डूबे प्रकरणात आरोपी कोणता दाखलवा? किती पैसे देवून प्रकरण मिटले हे समोर येईल. ते परळीतील लोक सुद्धा मला भेटणार आहेत. मी 1999 पासून आमदार आहे. त्यामुळे हे वागणं कुठलं आहे? काही रेकॉर्डिंग व्हायरल करा, पिस्तुलच्या लायसनला परवानगी कुणाची? हे लायसन रद्द करा. अशी मागणीही सुरेश धस यांनी केली आहे.