BJP MLA Ganpat Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी उल्हासनगर पोलीस स्टोशनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. (Ganpat Gaikwad) तेव्हापासून तुरूंगात असलेले गणपत गायकवाड आता (BJP MLA ) विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी तुरूंगाबाहेर येणार आहेत.
९ ते ४ वाजेपर्यंत मतदान जयंत पाटलांकडून शिंदेंना बादशाहची उपमा; म्हणाले, बादशाहच्या मनात आलं अन्…
विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी गायकवाड यांनी कल्याण अतिरिक्त जिल्हा न्यायालयाला विनंती अर्ज केला होता, तो मान्य करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार आमदार गणपत गायकवाड आज सकाळी ९ वाजता तळोजा जेलमधून निघणार आहे. यावेळी त्यांना मोठ्या पोलिस बंदोबस्तात विधान भवनात आणले जाणार आहे. सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत विधिमंडळ कामकाजासाठी ते तुरूंगाबाहेर असणार आहे. दरम्यान या निवडणुकीत आमदार गणपत गायकवाड कोणाला मतदान करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जमिनीचा वाद काय आहे?
गणपत गायकवाड आणि त्यांच्या पार्टनरने कल्याणमधील एका गावात जमीन खरेदी केली होती. या जमिनीचे पैसे देण्यावरून वाद सुरू होता. या जागेवर विकास करण्यासाठी करार करण्यात आला आहे. या जागेवर आमदार गणपत गायकवाड हे सुद्धा भागीदार असल्याचं समजतं. गणपत गायकवाड हे त्या जमिनीवर कुंपण करण्यासाठी गेले असता त्यांचा वाद झाला. या वादात जाधव कुटुंबियांनी महेश गायकवाड यांना मध्यस्थी करून वाद मिटवण्याची विनंती केली. यानंतर हा वाद थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. आणि तिकडे गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं.
गोळीबार कसा झाला? राज्यात पुन्हा आमदारांची फोडाफोडी? शिंदे-ठाकरेंसह सर्वांचे आमदार 5 स्टार हॉटेलात रवाना
शुक्रवारी (2 जानेवारी) रात्री उशिरा भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्येच खुलेआम गोळीबार करण्यात आला. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या समोरच ही घटना घडली. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात एकनाथ शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबतचे सहकारी राहुल पाटील जखमी झाले. दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड दोघेही जमिनीच्या वादाप्रकरणी एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्या.
काय म्हणाले राऊत
भाजप आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणात तुरुंगात आहेत. मात्र, त्यांना आज विधान परिषदेच्या मतदानासाठी बाहेर सोडण्यात आलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, गणपत गायकवाड मतदानासाठी तुरुंगाबाहेर येऊ शकतात. मात्र, शरद पवार गटाचे नवाब मलिक हे मतदानासाठी नाही येऊ शकले, अनिल देशमुख यांंनाही येऊ दिलं नाही. परंतु, गणपत गायकवाड येऊ शकतात. यालाच म्हणतात सत्तेचा गैरवापर, यालाच म्हणतात दादागिरी असंही राऊत म्हणाले आहेत.